Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दुधाला ३४ रुपये दर द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन करू

Milk MSP : शिवधर्म फाउंडेशनचा इशारा; दुग्ध विकास कार्यालयासमोर आंदोलन

Team Agrowon

Milk Subsidy : शासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे दुधाला ३४ रुपये हमीभाव मिळावा, वंचित दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी पुणे येथील दुग्ध विकास कार्यालयासमोर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन मंगळवारी (ता. १८) केले. मागण्या मान्य न झाल्यास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी दिला.

श्री. काटे म्हणाले, की दूध व्यवसाय हा पूर्वी जोडधंदा म्हणून पाहिला जात होता. कारण नागरिकांकडे शेती मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे शेतीतील कामे भरपूर प्रमाणात असत व दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा होता.

पण आताच्या काळामध्ये वाढती महागाई आणि जमिनीचे होत जाणारे वाटे पाहता दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. दुधाला ३४ रुपये हमीभाव देण्याचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले होते. परंतु त्यापेक्षा कमी दर मिळत असल्याने दुग्ध व्यावसायिक त्रस्त आहे. त्यामुळे बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनामध्ये शेतकरी व दुग्ध व्यावसायिक सहभागी झाले होते.

सहकारी दूध संघ वाढवून खासगी दूध संघ कमी झाले पाहिजेत. खासगी दूध संघाच्या मनमानी कारभारामुळे आज शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. खासगी दूध संघाच्या मदतीने दूध घेतले जाते. शेती कमी राहिल्यामुळे काही शेतकऱ्यांना गाईचा चारा हा विकत घ्यावा लागत आहे. गाईचा चारा महागल्यामुळे शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडणारा राहिला नाही.

- दीपक काटे, संस्थापक शिवधर्म फाउंडेशन, बारामती

...या मागण्या आहेत

- ३४ रुपये दर देण्याच्या शासन निर्णयाच्या आदेशाची पालन न करणाऱ्या खासगी दूध संघावर कठोर कारवाई करण्यात यावी.

- शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता असणारे मंत्री या विभागास मिळावेत.

- मंत्र्यांनी स्वतःची कामे न करता शेतकऱ्यांसाठी आत्मीयता ठेवून त्यांच्याकरता महत्त्वाची कामे करावीत.

- शेतकऱ्याच्या दुधाला ३४ रुपये हमीभाव मिळाला नाही, तर उपोषण करणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT