Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई द्यावीच लागेल

Team Agrowon

Latur News : यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व अजून सुरूच आहे. या स्थितीत पीकविम्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागले. संबंधित कंपनीला पीकविम्याची भरपाई द्यावीच लागेल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी पीकविमा कंपनीला सुनावले.

उदगीर येथे गुरुवारी (ता. २६) पीकविमा, अतिवृष्टी नुकसान व शेतकऱ्यांच्या समस्या या विषयांवर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष व संचालकांच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, एसबीआय जनरल विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अक्षय ढोणे, जिल्हा समन्वयक तौसीफ कुरेशी, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, बालाजी भोसले, श्याम डावळे, रामराव बिरादार, बसवराज पाटील कौळखेडकर उपस्थित होते. क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले, की यावर्षी उदगीर व जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांचे हाताला आलेले सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. या शेतकऱ्यांच्या सोबत राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची दखल दखल घेऊन तातडीने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे अतिवृष्टी अनुदान देण्यात येणार आहे. यासोबत पीकविमा कंपनीला सुद्धा तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असे नमूद केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जाधव म्हणाले, की शेतकऱ्यांनी ज्यावेळी पिकाचे नुकसान होईल त्यावेळी लगेच तातडीने ऑनलाइन पद्धतीने पीकविमा कंपनीला पूर्वसूचना द्यावी, असे नमूद केले.

तालुका कृषी अधिकारी नाबदे म्हणाले, की २०२०-२१ पासून २०२३ पर्यंत तालुक्यातील पन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीत जवळपास दीडशे कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदानही शासन देणार असून त्यासाठी तालुक्यातील जवळपास ५१ हजार शेतकऱ्यांना ५२ कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे सादर केली आहे.

७२ तासांत पूर्वसूचना द्यावी

सततच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ७२ तासांत पूर्वसूचना द्यावी. जेणेकरून विम्याचा लाभ घेता येईल. पूर्वसूचना देताना शेतकऱ्यांनी अचूक माहिती देणे गरजेचे आहे. क्रॉप इन्शुरन्स अॅप किंवा कृषी रक्षक हेल्पलाइनवर फोन करून माहिती देता येईल. हेल्पलाइन नंबर १४४४७ अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT