Amaravati News : गेल्या वर्षी आंबिया बहरातील संत्रा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतु केंद्र व राज्य सरकारने विमा कंपनीकडे आपल्या हिस्स्याच्या रक्कमेचा भरणा न केल्याने संत्रा बागायतदारांवर विमा भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
बांग्लादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ, त्यानंतर बांगलादेशमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता यामुळे बांगलादेशमधील संत्रा निर्यात प्रभावित झाली. त्याचा देशांतर्गत संत्रा फळांच्या दरावर परिणाम झाला.
याच काळात संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळांची गळ मोठ्या प्रमाणावर झाली. यामुळे देखील संत्रा बागायतदार मेटाकुटीस आला होता. गेल्या काही वर्षांपासून संत्रा नुकसानीनंतर भरपाई मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपिक विमा काढण्यावर भर दिला आहे.
२०२३-२४ यावर्षातही तो काढण्यात आला. दरम्यान बुरशीजन्य रोगांच्या परिणामी संत्रा झाड जळणे, त्यासोबतच फळगळ अशा कारणांमुळे नुकसान झाले असताना अद्यापही शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.