Chhatrapati Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Sugar Factory Election: ‘छत्रपती’वर पवार-जाचक यांच्या पॅनेलची सत्ता

Cooperative Sugar Politics: इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार व पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली.

गणेश कोरे

Pune News: पुणे जिल्‍ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्या श्री जय भवानीमाता पॅनेलने श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांचा धुव्वा उडवून एकहाती विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत विजयी पॅनेलच्या उमेदवारांनी विरोधकांचा पाच ते साडेसहा हजार मताधिक्याने पराभव केला.

निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याला हजेरी लावून जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखानाच्या पाच वर्षे कारभार चालणार असल्याचे जाहीर केले. पवार यांनी प्रचाराची धुरा क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर सोपवली होती.

तर ‘छत्रपती’चे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, माजी संचालक तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर यांनी एकत्र मोट बांधून श्री छत्रपती बचाव पॅनेल विरोधामध्ये उभे केले. छत्रपती बचाव पॅनेलला सर्व जागा लढविता आल्या नाहीत. तसेच त्यांच्या दोन उमेदवारांनी पवार-जाचक यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला.

पवार-जाचक युतीमुळे निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र निर्माण झाले होते. कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक महत्त्वाची असल्यामुळे सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवर विश्‍वास ठेवून श्री जय भवानीमाता पॅनेलकडे पाच ते साडेसहा हजारांच्या मताधिक्याने एकहाती सत्ता दिली. तसेच ब वर्गातून अशोक पाटील यांचा एकतर्फी विजयी झाला.

करणसिंह घोलप यांचा पराभव

छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांचे पुत्र करणसिंह घोलप यांना ही पराभवाला सामोरे जावे लागले.

श्री जय भवानीमाता पॅनेलचे विजयी उमेदवार व मिळालेली अंतिम मते ः

गट नंबर - १ पृथ्वीराज जाचक (११ हजार ६९४), अॅड. शरद शिवाजी जामदार (१० हजार ५२९),

गट नंबर - २ रामचंद्र विनायक निंबाळकर (१० हजार ९२९) , शिवाजी रामराव निंबाळकर (१० हजार ४३१)

गट नंबर -३ पृथ्वीराज श्रीनिवास घोलप (९ हजार ६७२), गणपत सोपाना कदम (९ हजार २९७)

गट क्रमांक - ४ प्रशांत दासा दराडे (११ हजार १८०), अजित हरिश्‍चंद्र नरुटे (११ हजार ९०), विठ्ठल पांडुरंग शिंगाडे (१० हजार २३५)

गट क्रमांक - ५ अनिल सीताराम काटे (११ हजार ७८९), बाळासाहेब बापूराव कोळेकर (११ हजार ७६८), संतोष शिवाजी मासाळ (१० हजार ३०५)

गट क्रमांक - ६ कैलास रामचंद्र गावडे (११ हजार ८३२), नीलेश दत्तात्रेय टिळेकर (११ हजार ५६३), सतीश बापुराव देवकाते (११ हजार २६१)

इतर मागास प्रवर्ग

तानाजी ज्ञानदेव शिंदे (११,३५८)

अनुसूचित जाती जमाती

मंथन बबनराव कांबळे (११,५११)

महिला राखीव

सुचिता सचिन सपकळ (१०,३८४)

माधुरी सागर राजापुरे (१०,७७४)

भटक्या विमुक्त जाती

डॉ. योगेश बाबासाहेब पाटील (११,८४३)

ब वर्ग - अशोक संभाजी पाटील (२८०)

पृथ्वीराज जाचक होणार अध्यक्ष

अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यामध्ये पृथ्वीराज जाचक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी घोषणा करून जाचक यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे कारखाना चालविणार असल्याचे जाहीर सभेमध्ये सांगितले होते. निवडणुकीपूर्वीच जाचक यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केले. सभासदांनी पवार-जाचक पॅनेलवर विश्‍वास ठेवून भरभरून मतदान केले. जाचक हे गट नंबर-१ मधून ६ हजार ८४४ विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT