Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : एप्रिलमधील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात एप्रिलमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य सरकारने जिल्ह्यासाठी १६ कोटी ५५ लाखांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Akola Rain News : अवकाळी पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात एप्रिलमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य सरकारने जिल्ह्यासाठी १६ कोटी ५५ लाखांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात नऊ हजार २६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बीतही अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला होता. भर उन्हाळ्यात एप्रिलमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते.

लिंबू, आंबा, संत्री, गहू, भाजीपाला, कांदा पिकांना सर्वाधिक फटका बसला होता. या नुकसानीचे पंचमाने कृषी, महसूल व जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून संयुक्तपणे करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यासाठी १६ कोटी ५५ लाख सात ८०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अकोला जिल्ह्यातील ७०७ गावे बाधित झाली होती. त्यातील नुकसानग्रस्त शेतकरी संख्या १५ हजार ३७१ होती. या शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र नऊ हजार २६८ एवढे होते.

त्याची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने १६ कोटी ५५ लाख सात हजार ८०० रुपये निधी मंजूर केल्याने खरिपापूर्वी १५ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निधी वितरणाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

शासनाकडूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम

पीक नुकसानाची मदत यापूर्वी शासनाकडून जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातून तालुक्यांना रक्कम वितरित केली जात होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत होती. त्याला लागणारा विलंब बघता आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन ऑनलाइन रक्कम जमा करणार आहे.

मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ती राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे सादर केली जाईल. त्यानुसार मदतीची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मदत वितरणाबाबत प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तहसीदलरांना लेखी सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT