Patalganga Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाताळगंगेचा कालवा नादुरुस्‍त

Patalganga Sub-Irrigation Canal : खालापूर तालुक्यातील काही भागात शेतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत पाताळगंगा उपसिंचन कालव्याला पाणी येत सोडण्यात येते, परंतु माजगाव, आंबिवली, वारद, पौध तसेच परिसरातील अनेक आदिवासी वाड्यांत पाणीपुरवठा करणारे कालवे २०१७ पासून कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Khopoli News : खालापूर तालुक्यातील काही भागात शेतीसाठी १५ डिसेंबरपर्यंत पाताळगंगा उपसिंचन कालव्याला पाणी येत सोडण्यात येते, परंतु माजगाव, आंबिवली, वारद, पौध तसेच परिसरातील अनेक आदिवासी वाड्यांत पाणीपुरवठा करणारे कालवे २०१७ पासून कोरडे पडले आहेत.

कालव्याची दुरुस्‍ती झाली की पाणी सोडले जाईल, असे आश्‍वासन दरवर्षी लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत असले तरी सहा-सात वर्षांपासून सिंचनासाठी पाणी न मिळाल्‍याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

पाताळगंगा नदीवरील कालव्याची दुरवस्‍था झाली आहे. ठिकठिकाणी गळती लागल्‍याने काही भागांत कालव्याचे पाणी पोहोचतच नाही. परिसरात शेकडो हेक्टर भात शेती आहे. बहुतांश शेतकरी भातशेती व भाजीपाला लागवड करतात,

मात्र कालव्याचे पाणी नियोजित वेळेवर पोहचत नसल्यामुळे उन्हाळी भातशेती करता येत नाही. तसेच फळभाज्‍यांच्या लागवडीतही अडचणी येतात. कालवा नादुरुस्‍त झाल्‍याने अनेक भागात सिंचनासाठी पाणीच मिळत नाही. त्‍यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी भातलागवडीकडेही पाठ फिरवल्‍याचे दिसून येत आहे.

खरसुंडी बंधाऱ्यातून पाणी कालव्याला येते, मात्र पाताळगंगा उपसिंचन कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्‍याची दुरुस्तीचा प्रस्ताव पाच महिन्यांपूर्वी वरिष्‍ठ कार्यालयात पाठवला आहे.
भारत गुंटूरकर, उपअभियंता पाटबंधारे विभाग
कालव्याला पाणी उपलब्ध होत नसल्याने पाच-सहा वर्षांपासून भात लागवड करता येत नाही. शिवाय गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. सोबत विहिरीला पाणी राहत नाही, कालव्याची देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव असाच प्रलंबित राहिल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करणे अवघड होईल.
रवी काठावले, शेतकरी माजगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT