Highway Agrowon
ॲग्रो विशेष

National Highway : राष्ट्रीय महामार्ग रावेरमधून जाणे अवघडच

Nitin Gadkari : न्यायालयीन प्रक्रिया राबवून किंवा थेट केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तिगत लक्ष घातले तरच या राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलू शकतो असे त्यांनी सांगितले.

Team Agrowon

Jalgaon News : केंद्र सरकारच्या सडक आणि परिवहन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील नियोजित राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग पुन्हा बदलणे अशक्य नसले तरीही कठीण असल्याची प्रतिक्रिया भूसंपादनाचे काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाच्या राजपत्रात म्हणजे गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या मार्गानेच हा नियोजित महामार्ग जाईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

तळोदा बऱ्हाणपूर हा २४० किलोमीटरचा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून जाईल असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले असले, तरीही सामान्यपणे एकदा या मंत्रालयाने निश्‍चित केलेला मार्ग याआधी कधी बदलल्याचे उदाहरण नाही. न्यायालयीन प्रक्रिया राबवून किंवा थेट केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्तिगत लक्ष घातले तरच या राष्ट्रीय महामार्गाचा मार्ग बदलू शकतो असे त्यांनी सांगितले.

नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भूसंपादनाचे काम करणाऱ्या कायदे तज्ज्ञांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे संबंधित मंत्रालयाने जाहीर केलेले राजपत्र आणि दुसरीकडे खासदार खडसे यांनी केलेला दावा यामुळे या भागातील नागरिक व शेतकरीही द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत. संबंधित मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले राजपत्र हाच भूसंपादन कायद्याच्या ३-अ या उपनियमाचा अर्थ असल्याचेही तज्ज्ञांनी लक्षात आणून दिले.

यानंतर आगामी १५ दिवस ते ३ महिन्याच्या आत हा राष्ट्रीय महामार्ग नियोजित गावांच्या कोणकोणत्या गट क्रमांकाच्या शेती शिवारातून जातो हेही स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असेल किंवा लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपलेलीही असेल अशीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

२३ जानेवारीला या विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वेक्षण व अन्य कामांना स्थगिती देण्याची शिफारस केल्यानंतर सव्वा महिन्यांनी म्हणजे २९ फेब्रुवारीला हे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे, याचा अर्थ या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही स्थगितीची शिफारस स्वीकारली नाही असाही होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

Cotton Processing Season: कापूस प्रक्रियेला दसऱ्यानंतर वेग येणार

SCROLL FOR NEXT