Crop Insurance agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत १५ जुलैपूर्वी सहभाग घ्या

Crop Insurance : या योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी व ज्वारी आदी पिकांसाठी विमा काढता येईल.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगामात राबवली जात असून शेतकऱ्यांनी सोमवारपर्यंत (ता.१५) सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कपाशी व ज्वारी आदी पिकांसाठी विमा काढता येईल. शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पीकविमा पोर्टलवर सहभागाची नोंदणी करता येईल. पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज ४० रुपये दिले जातात.

त्यानुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र धारकाकडून केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीकविमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

योजनेत सहभाग नोंदविण्यासाठी नजीकचे सामूहिक सेवा केंद्र , बँकेतून अथवा PMFBY पोर्टल https:pmfby.gov.in वर स्वतः शेतकरी तसेच digisafe ब्रोकरेज कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत विमा काढता येईल. पीकविमा नोंदणी करताना आधार संलग्र बँक खाते क्रमांक बंधनकारक केले आहे. या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे.

पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

अकोला जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता.दोन) एक लाख ४२० शेतकरी अर्ज दाखल झाले होते. तर बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ३४ हजार ६०४ आणि वाशीम जिल्ह्यात १ लाख ७७ हजार ४०४ शेतकरी अर्ज आलेले आहेत.

तीनही जिल्हे मिळून पाच लाखांवर शेतकरी अर्ज पोहोचले आहेत. गेल्या २०२३ च्या खरीप हंगामात या तीनही जिल्ह्यांमधून एकूण १६ लाखांवर शेतकरी अर्ज दाखल झाले होते. यंदा पीकविमा काढण्यासाठी अद्याप १२ दिवस शिल्लक असून याही हंगामात गेल्या वर्षाप्रमाणेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवली असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT