Dhananjay Mahadik Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Session : अवकाळी नुकसानीची भरपाई द्या ; संसदेत धनंजय महाडिकांची मागणी

Dhananjay Mahadik Speech : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु झाली. पहिल्याच दिवशी राज्यसभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

Swapnil Shinde

Parliament Winter Session 2023 : मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावानुसार केंद्राकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राज्यसभेत खा. धनंजय महाडिक यांनी केली आहे.

दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राज्यसभेत धनंजय महाडिक यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. धनंजय महाडिक म्हणाले, महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे द्राक्षे, केळी, भात, कांदा, सोयाबीन आणि कापूस पिके जमीनदोस्त झाली आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीचा ९६ तालुक्यातील १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्राला जोरदार तडाखा बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चाही झाली असून या नुकसानग्रस्‍त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT