Parbhani News : जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षा मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १ हजार ५७८ हेक्टर फळबाग तसेच फुलझाडांची लागवडीचे उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ८८६ शेतकरी लाभार्थ्यांच्या ६८५.८१ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली आहे.
जिल्ह्यात मनरेगा फळबाग लागवडीचे ४५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.याअंतर्गंत ३२ लाख ४२ हजार रुपयावर निधी खर्च झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गंत फळबाग लागवडीसाठी २०२४-२५ मध्ये परभणी जिल्ह्यातील ७२४ गावांची निवड करण्यात आली.
या अंतर्गंत शेतामध्ये फळबाग लागवड करण्यासाठी १ हजार २६३ वैयक्तिक लाभार्थी तर बांधावर फळबाग लागवड करण्यासाठी ३९४ लाभार्थी,पडीक जमिनीवर फळबाग लागवडीसाठी २८ लाभार्थी मिळून एकूण १ हजार ६८५ शेतकरी लाभार्थींच्या १ हजार ५७८.३८ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यातील १ हजार ६२७ शेतकऱ्यांना १ हजार ३७५.१३ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ८८६ लाभार्थ्यांनी ६८५.८१ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी १४ लाख ४८ हजार ५९३ खड्डे खोदले.
लागवड करण्यात आलेल्या फळपिकांमध्ये आंबा २६२.४६ हेक्टर, चिकू ३.५०हेक्टर, पेरू २२.२५ हेक्टर,संत्रा ४९ हेक्टर, मोसंबी ३.१० हेक्टर, लिंबू ४.३६ हेक्टर, नारळ १७.७० हेक्टर, सीताफळ ९.७० हेक्टर, अंजीर ०.६० हेक्टर,केळी २८१.३१ हेक्टर यांचा समावेश आहे.
याशिवाय शेवगा ३.८० हेक्टर, बांबू ११.९२ हेक्टर, गुलाब ९.६५ हेक्टर, निशिगंध २.१३ हेक्टर, तुती ४ हेक्टर यांचा समावेश आहे. शेतामध्ये ५०७.७७ हेक्टर आणि बांधावर १७७.७४ हेक्टर अशी एकूण ६८५.५१ हेक्टरवर फळबाग लागवड आहे. या अंतर्गंतच्या कामांवर ६६ हजार २९ मजूर होते.त्यावर ३१ लाख ४२ हजार ६३३ रुपये खर्च आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.