Nagar Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Deficit : परभणीत २३८.७, तर हिंगोलीत ५४.८ मिलिमीटर पावसाची तूट

Latest Rain Update : या कालावधीत यंदा परभणी जिल्ह्यात २३८.७ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात ५४.८ मिलिमीटर पावसाची तूट आली आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जून ते सप्टेंबर या कालावधीत परभणी जिल्ह्यामध्ये सरासरी ७६१.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना या वर्षी ५२२.६ मिलिमीटर (६८.६ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७९५.३ मिमी पाऊस अपेक्षित असताना या वर्षी ७४०.५ मिमी (९३.१ टक्के) पाऊस झाला.

या कालावधीत यंदा परभणी जिल्ह्यात २३८.७ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात ५४.८ मिलिमीटर पावसाची तूट आली आहे. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडले आणि हिंगोली जिल्ह्यातील २२ मंडलांत असे दोन जिल्ह्यांतील एकूण ७४ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदाच्या (२०२३) सप्टेंबर महिन्यात या दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील पावसाची सरासरी १६९ मिलिमीटर आहे. यंदा १८३.६ मिलिमीटर (१०८.६ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी १४०.७ मिमी (८३.३ टक्के) पाऊस झाला होता. त्यातुलनेत यंदा ४२.९ मिलिमीटर पाऊस जास्त झाला.

यंदा सप्टेंबरमध्ये २४ मंडलांत सरासरीपेक्षा कमी तर २८ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांतील सरासरी तुलनेत यंदा २३८.९ मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. पिंपळदरी मंडलात सर्वांत कमी ३०३.८ मिमी (४१.९ टक्के), तर मोरेगाव मंडलात सर्वाधिक ६९०.२ (९३.६ टक्के) पाऊस झाला.

गतवर्षी (२०२२) या कालावधीत ६५०.४ (८५.४ टक्के) पाऊस झाला होता. यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात हिंगोली जिल्ह्याची पावसाची सरासरी १५४.७ मिमी आहे. यंदा प्रत्यक्षात २३२.५ मिलिमीटर (१५०.३ टक्के) पाऊस झाला.

सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलात आजेगाव (८४.८ टक्के) व सिरसम (९२.९ टक्के) या २ मंडलांचा समावेश आहे. उर्वरित २८ मंडलांत सरासरीपेक्षा जास्त (गोरेगाव (१०४.२ टक्के ते गिरगाव २६२.५ टक्के ) पाऊस झाला. गतवर्षी (२०२२) सप्टेंबरमध्ये १५४.५ (९९.९ टक्के) पाऊस झाला होता.

जिल्ह्याची जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची सरासरी ७९५.३ मिमी आहे. यंदा प्रत्यक्षात ७४०.५ मिलिमीटर (९३.१ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी ८८५.५ मिमी (१११.३ टक्के) पाऊस झाला होता. यंदा या कालावधीत २२ मंडलांत सरासरीपेक्षा कमी, तर ८ मंडलांत जास्त पाऊस झाला. यंदा जून, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर जुलै व सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.

जून ते सप्टेंबर तालुकानिहाय

पाऊस स्थिती (मिलिमीटरमध्ये)

तालुका सरासरी पाऊस प्रत्यक्ष झालेला पाऊस टक्केवारी

परभणी ८११ ५२८ ६५.१

जिंतूर ७३३.४ ४९९.७ .६८.१

सेलू ७३७.३ ५६०.३ ७६.०

मानवत ७३२.२ ५०८.१ ६९.४

पाथरी ७३९.५ ५१४.२ ६९.५

सोनपेठ ६७९.६ ४१४.६ ६१.०

गंगाखेड ७२५.७ ४९३.४ ६८.०

पालम ७३८.९ ५७२.७ ७७.५

पूर्णा ८०७.० ५८०.७ ७२.०

हिंगोली ८६७.९ ७८२.४ ९०.१

कळमनुरी ७९५.४ ८१९.५ १०३.०

वसमत ८२४.० ७८४.० ९५.१

औंढा नागनाथ ७३६.१ ७४५.८ १०१.३

सेनगाव ७२९.७ ५६१.२ ७६.९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT