Papaya Market Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Harvesting : खानदेशात पपई काढणीवर

Papaya Production : खानदेशात पपईची लागवड जूनमध्ये आटोपली असून, एकट्या शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात सुमारे तीन हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पपईची लागवड जूनमध्ये आटोपली असून, एकट्या शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात सुमारे तीन हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली आहे. तीन्ही जिल्ह्यांत एकूण साडेसात हजार हेक्टरवर लागवड झाली असून, पपईखालील क्षेत्र यंदा स्थिर आहे. जानेवारी व फेब्रवारी महिन्यात लागवड केलेल्या पपई पीक फळे पक्व होत असून, पीक काढणीवर येत आहे.

पपईतील काढणी सप्टेंबरमध्ये अनेक क्षेत्रांत सुरू होईल, असे दिसत आहे. पपईसाठी खानदेशातील नंदुरबार जिल्हा प्रसिद्ध आहे. लागवड फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाली. अनेक शेतकऱ्यांनी पपईत कलिंगडाचे आंतरपीक घेतले आहे. पपईच्या रोपांचे दर यंदा वेगवेगळे होते. त्यात अधिकचा खर्च शेतकऱ्यांना लागला आहे.

प्रतिरोप सात, आठ, ११ रुपये असे दर विविध भागांत होते. नंदुरबारात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर, धुळ्यात १२०० हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे १९०० हेक्टरवर लागवड झाली आहे. नंदुरबार गेले तीन वर्षे पपई लागवडीत आघाडीवर राहिला आहे. पण नंदुरबारातील लागवड यंदा घटली आहे.

धुळ्यात शिरपूर व शिंदखेडा भागात अधिक लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जामनेर, मुक्ताईनगर व इतर भागात लागवड झाली आहे. पपईचे दर गेल्या हंगामात कमाल २८ व किमान अडीच रुपये प्रतिकिलो, असे मिळाले. दर अपेक्षेपेक्षा कमी होते. तसेच कमी पावसात मोठे नुकसानही शेतकऱ्यांना सहन करावे लागले.

अनेक शेतकऱ्यांच्या पपई बागा विविध विषाणूजन्य रोगाने नोव्हेंबरमध्येच काढून फेकाव्या लागल्या. नुकसानीची समस्या लक्षात घेता यंदा पपई लागवडीनंतर लागलीच कलिंगडाचे आंतरपीक त्यात घेऊन खर्च काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पपई पिकासाठी गादीवाफे, ठिबक तंत्रज्ञानाचा अवलंब ९० टक्के पपई उत्पादकांनी केला आहे. पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सिंचनाबाबत काळजीपूर्वक कार्यवाही केली जात आहे. परंतु काढणीला यंदा विलंब होत असल्याचेही चित्र आहे. अतिउष्णतेत पपई बागांना फटका बसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT