Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सततच्या पावसामुळे पानपिंपरीचा उडाला रंग

Crop Insurance : काही मालावर बुरशी चढल्याचेही दिसून येत आहे. तर वादळामुळे पानपिंपरीच्या वेलींचेही प्रचंड नुकसान झाले.

 गोपाल हागे

Akola News : जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यातील पानपिंपरीच्या पिकाला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पानपिंपरीचा रंग उडाला आहे. बहुतांश माल पांढरा पडत चालला आहे. काही मालावर बुरशी चढल्याचेही दिसून येत आहे. तर वादळामुळे पानपिंपरीच्या वेलींचेही प्रचंड नुकसान झाले.

जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यात पानपिंपरीची सुमारे ५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेती होत आहे. हंगामी स्वरूपाचे हे वनौषधी पीक म्हणून ओळखले जाते. यातून शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या तुलनेत चांगले पैसेही मिळत होते. यंदा पानपिंपरी तोडणीच्या काळातच पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

पानपिंपरीची तोडणीचा हंगाम सुरू आहे. पानपिंपरी वाळविण्यासाठी पाच ते सहा दिवस ती उन्हात टाकतात. दरम्यान, याच काळात पाऊस झाल्याने बहुतांश पानपिंपरीचा माल भिजला. काही माल हा ओलसर राहिल्याने त्यावरही बुरशी चढली.

मालाचा दर्जा निकृष्ट झाला आहे. आता ही पानपिंपरी वाळवली तरी त्याचा फारसा उपयोग नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. झाडावर पिकलेली पानपिंपरी गळून पडत आहे. हिवरखेड, अडगाव, अकोट व इतर काही गावे ही पानपिंपरीच्या उत्पादनासाठी ओळखली जातात.

उत्पादकांची बोळवण

पानपिंपरीला पिकाचा दर्जा नसल्याने पीकविम्याचे कवच मिळालेले नाही. आयुर्वेदिक उपयोगांसाठी ही पानपिंपरी सर्वाधिक वापरली जाते. एकरी लाखापर्यंत खर्च लागतो. पानवेली, पानपिंपरीसाठी अमरावती विभागीय औषधी वनस्पती व शेतकरी विकास अभियान समिती स्थापन झालेली आहे.

या समितीच्या तीन ते चार बैठकाही झाल्या. मात्र समितीने शासनाकडे केलेल्या शिफारशींवर अद्यापही गांभिर्याने विचार न झाल्याने पानपिंपरीला पिकाचा दर्जा मिळू शकलेला नाही. परिणामी नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना बोळवणीपलीकडे काही मिळत नाही.

यंदा पाच एकरात लागवड आहे. चार एकरांतील पानपिंपरी तोडणी करून वाळवणीला टाकली. जवळपास १०० क्विंटल पानपिंपरी पावसात भिजली. बुरशी लागल्याने सर्व पानपिंपरी हातातून गेली आहे.
- योगेश दामधर, शेतकरी, हिवरखेड, जि. अकोला
सहा एकरांत पानपिंपरी होती. एकराला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च आला. पावसामुळे माल पाण्यात भिजल्याने पिकाचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मदतीची मोठी गरज आहे.
- उमेश रेखाते, पानपिंपरी उत्पादक, हिवरखेड, जि. अकोला
तेल्हाऱ्यात २०० हेक्टरपर्यंत पानपिंपरीचे क्षेत्र आहे. पावसामुळे हिवरखेडच्या भागात नुकसान झाले. वाळण्यासाठी टाकलेली पानपिंपरी ओली झाली. जी तोडणीला आली, तीही पांढरी पडली. नुकसानीचा आढावा घेत आहोत.
- गौरव राऊत, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT