Panhala Monsoon Rain agrowon
ॲग्रो विशेष

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Panhala Tehsil : पन्हाळा तालुक्यात खरीप हंगामात भात, ज्वारी, माका, नांगली, तृणधान्य, कडधान्य व तेलबियांचे चांगले उत्पादन होते.

sandeep Shirguppe

Kharip Season Monsoon : खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी विभागाने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धुळवाफ पेरणी केली. या दृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खरीप हंगामाती पूर्व तयारी सुरू केली आहे. यामध्ये डोंगराळ असलेल्या पन्हाळा तालुक्याच्या कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. परंतु या तालुक्याती पुरेसा वळीव पाऊस झाला नसल्याने मॉन्सून पूर्व पावसाची प्रतीक्षा करावी लागते आहे. यामुळे डोंगराळ पन्हाळा तालुक्यात शेतीच्या कामांना म्हणावा तसा वेग आला नसल्याचे चित्र आहे.

पन्हाळा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची गुजराण खरीप पिकांवरच होते. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटर आहे. त्यामुळे खरीप हंगामात भात, ज्वारी, माका, नांगली, तृणधान्य, कडधान्य व तेलबियांचे चांगले उत्पादन होते. हाच खरीप हंगाम साधण्यासाठी बळीराजाबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे.

मात्र खरीप हंगामाची पूर्वतयारीत जमिनीची मशागत महत्त्वाची असते. यावर्षी जमीन मशागतीसाठी आवश्यक पूर्वहंगामी पावसाने ओढ दिल्याने बळीराजाला पूर्वहंगामी पावसाची प्रतीक्षा आहे.

चालू वर्षी पेरक्षेत्राचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नात आहे. खरीप हंगामासाठी भात बियाणे ३०६० क्विंटल, सोयाबीन ३९० क्विंटल, भुईमूग १४५ क्विंटल, खरीप ज्वारी-५४ क्विंटल, मका २८ क्विंटल बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ती पूर्ण केली जाईल.

खरीप हंगामासाठी मागणीनुसार पन्हाळा गटास युरिया ४४८४ टन, डीएपी-१२१२ टन, सुपर फॉस्फेट -११५५ टन, म्युरेट ऑफ पोटॅश-८२० टन, संयुक्त खते ५४०४ टन अशी एकूण १३०७५ टन खते उपलब्ध करून दिली जातील. भात बियाण्यांत वाएसआर, शुभांगी, सारथी, पूनम, सोना, यशोदा या बियाण्यांची मागणी होत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी के. एम. घोलप व कृषी अधिकारी पंचायत समिती पन्हाळा एस. व्ही. शिंदे यांनी दिली.

पन्हाळा तालुक्याचे कृषी अधिकारी के. एम. घोलप म्हणाले की, खरीपासाठी लागणारी बी-बियाणे, खते, कीटकनाशके इ. शेती साहित्य तालुक्यातील निविष्ठा विक्री केंद्रात उपलब्ध करून दिली जातील. यातील गैरप्रकार टाळण्यासाठी निविष्ठा विक्री केंद्र तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना केली असून पथकामार्फत निविष्ठा विक्री केंद्र तपासणी होईल.

तालुक्यात पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तृणधान्य क्षेत्र १०,०४२

भात ९३७०

ज्वारी २४०

नागली ३७०

मका ५०

कडधान्य क्षेत्र १५२ हेक्टर

तूर ३०

मूग १४

उडीद ६

इतर कडधान्य १०२

तेलबिया लागवड ५८०० हेक्टर

भुईमूग ३८५०

सोयाबीन १९४८

तीळ २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT