Ashadhin Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : सेवाभावाच्या भावनेने वारीमध्ये प्रत्येकाने कर्तव्य पार पाडावे

Palkhi Health Services : सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.

Team Agrowon

Solapur News : सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून, हीच पांडुरंगाची सेवा आहे. प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी (ता.१३) केले.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवार, अति संचालक डॉ. संदीप सांगळे, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.

आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून वारकरी भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात यामध्ये कोणतेही त्रुटी राहू नये यांची दक्षता घ्यावी. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने पालखी सर्व मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी.

तसेच पालखी मार्गावरी संबंधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्या ठिकाणची स्वच्छता करून तत्काळ औषध फवारणी करावी. तसेच तेथील स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. महिला वारक-यांसाठी स्त्रीरोगतज्ञाच्या माध्यमातून विशेष तपासणीचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पालखी मार्गावरील पुरेशा औषधसाठा व तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता ठेवावी. पालखी सोहळ्यासोबत

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी

भाविक येतात, यासाठी आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, सुविधा आदीबाबतचा प्रचार -प्रसिध्दी करण्यात यावी. जेणेकरून आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांची माहिती सर्व वारक-यांपर्यत पोहोचविण्यात मदत होईल, असेही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. आमदार समाधान आवताडे यांनीही काही सूचना यावेळी केल्या.

पालखी मार्गावर २०३ दवाखाने

आरोग्य विभागाच्या वतीने केलेल्या तयारीबाबतचे सादरीकरण यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले. यामध्ये पालखी मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर २०३ आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील सर्व आरोग्य संस्थामध्ये पुरेशा औषधसाठा व तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ यांची उपलब्धता असणार आहेत, असे सांगितले.

वाखरी पालखी तळाची पाहणी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाखरी पालखी तळाची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत संचालक डॉ. विजय कंदेवार, आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

Donald Trump: भारत-पाक संघर्ष मीच थांबविला

Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

New Cooperative Societies: राज्यात सात हजार नव्या सोसायट्या स्थापन करा

Betel Leaf Rate: खाऊच्या पानांचे दर २०० ते ३०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT