Pandharpur Development Agrowon
ॲग्रो विशेष

Pandhrpur Corridor : कॉरिडॉर सर्वेक्षण सर्व्हेला मालमत्ताधारकांचे सहकार्य

Pandharpur Development : पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर सर्वेक्षणाला दुसऱ्या दिवशी स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

Team Agrowon

Pandharpur News : पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉर सर्वेक्षणाला दुसऱ्या दिवशी स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवसांमध्ये सुमारे ३६२ मालमत्ताधारकांनी प्रशासनाला सहकार्य केले, तर ११२ मालमत्ताधारकांनी माहिती देण्यास नकार दिला आहे.

मंदिर परिसरातील बहुतांश मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे यातून आता समोर आले आहे. गुरुवारपासून (ता. ८) विठ्ठल मंदिर परिसरातील मालमत्ताधारकांचे आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सर्वेक्षण सुरू झाले आहे.

गुरुवारी पहिल्या दिवशी १९९ मालमत्ता धारकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १४५ मालमत्ताधारकांनी आपली संपूर्ण माहिती भरून दिली आहे तर केवळ ५४ मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे. शुक्रवारी (ता. ९) दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात सर्वेक्षण करण्यात आले.

यामध्ये २७५ मालमत्ता धारकांचा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये २१७ मालमत्ताधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत सर्व्हे फॉर्ममध्ये आपली संपूर्ण माहिती भरून दिली आहे, तर ५८ मालमत्ताधारकांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. आणखी दोन दिवस सर्व्हेचे काम सुरू राहणार आहे.

येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार काम

येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी व नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी १२ टीम तयार करण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. मंदिर परिसरातील स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी आपली संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवली

Jowar Crop Care: अवकाळी पाऊस- गारपिटीमध्ये ज्वारी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

MSP Online Registration: भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

Navtejashwini Festiva: नवतेजस्विनी महोत्सवात सव्वाआठ लाखांची उलाढाल

Unseasonal Rain: जोरदार पावसासह गारपिटीचा दाणादाण

SCROLL FOR NEXT