Pandharpur Development : पंढरपूर विकास आराखड्यासाठी मालमत्ताधारकांचे सर्व्हेक्षण सुरू

Vithhal Rukmini Temple : ढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
Pandharpur Corridor Plan
Pandharpur Corirdor Agrowon
Published on
Updated on

Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक सर्व्हेक्षण करण्यात येत असून, १२ पथकाद्वारे मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

संबंधित मालमत्ताधारकांनी सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. पंढरपूर येथील विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी विक्रेते, महाराज मंडळी यांच्याशी प्राथमिक चर्चा करून समस्या जाणून घेण्यासाठी केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे ०१ मे व ०२ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी चर्चा केली होती.

Pandharpur Corridor Plan
Pandharpur Coridor : कॉरिडॉर सर्व्हेचे काम तीन आठवड्यांत करणार

त्याअनुषंगाने प्राथमिक सर्व्हे गुरुवार (ता.८)पासून सुरु करण्यात आला आहे. सदर सर्व्हे १२ पथकाव्दारे करण्यात येत असून, या पथकात केबीपी कॉलेजचे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश आहे. सदरचे सर्व्हेक्षण प्राथमिक असून, ६३० मालमत्ताधारकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.

सर्व्हेक्षणामुळे बाधित नागरिकांचे सामाजिक, आर्थिक परिणामांची माहिती गोळा होणार असल्याने, विकास आराखड्याची व्याप्ती लक्षात घेऊन संबंधितांना विश्वासात घेऊन द्यावयाची भरपाई व पुनर्वसन याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार येईल. बाधितांची कमीत कमी जागा घेऊन जास्त लाभ कसा देता येईल याबाबतही प्रयत्न करण्यात येणार आहे.

Pandharpur Corridor Plan
Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉरबाबत सरकार सकारात्मक

सर्व्हेक्षणामध्ये विचारली जातेय ही माहिती

पंढरपूर विकास आराखड्यातील बाधितांची सर्व्हे पथकाकडून संबंधित मालमत्ता धारकांचे नाव, वय, जातीचा प्रवर्ग, व्यवसाय, जागेचे क्षेत्रफळ, नगर भूमापन क्रमांक, मिळकत पत्र, भाडेकरुचे नाव, कुळ, बाधित जागेचे मंदिरापासून अंदाजे अंतर, महत्त्वाच्या रस्त्यापासून असलेले अंतर, बाधित जागेची दर्शनी बाजू, बांधकामाचे वर्णन व प्रकार, जागा कोणत्या कारणासाठी वापरात आहे.

व्यवसायासाठी असणाऱ्या जागेचा कधीपासून वापर करण्यात येत आहे. प्रमुख चार वाऱ्यांमध्ये व्यावसायिक वापरातून होणारे अंदाजे उत्पन्न, संपादनामुळे बाधित होणारे उत्पन्न, पुनर्वसनाचा लाभ अपेक्षित आहे का?, मालमत्तेच्या अनुषंगाने मालक आणि भाडेकरू तसेच कूळ यांच्यामध्ये जागेबाबत वाद आहे का? मालमत्तेवर कर्ज गहाणखत बोजा, पुनर्वसन दरम्यान तात्पुरत्या घरांची गरज तसेच पुनर्वसन प्रक्रियेबाबत सूचना व अभिप्राय आदीबाबत माहिती सर्व्हेक्षण पथकाकडून गोळा करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com