Flood Affected Agriculture agrowon
ॲग्रो विशेष

Flood Affected Agriculture : पूर बाधित कृषी, फळबागांचे पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांचे तलाठ्यांना आदेश

Kolhapur Flood : कोल्हापूर शहर परिसर, करवीर तालुक्यासह ज्या-ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.

sandeep Shirguppe

Flood Affected Agriculture Kolhapur : 'कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी संयुक्तरित्या हा पंचनामा करावा. त्याबाबत तातडीने अहवाल तयार करून त्याद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करावे’, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले. त्यानुसार आज पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आल्याचे येडगे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘कोल्हापूर शहर परिसर, करवीर तालुक्यासह ज्या-ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच ज्या ठिकाणी पूर ओसरला आहे, अशा ठिकाणचे पंचनामे तत्काळ केले पाहिजेत. पंचनामे कसे करावेत, याबद्दलचे आज प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार उद्यापासून शक्य असेल त्या ठिकाणी पंचनामे केले जाणार आहेत.

गावच्या तलाठ्यांनी नुकसान झालेली शेतजमीन व पिकांचे सर्व्हे, गट क्रमांक पंचनामे करायला आलेल्या पथकास दाखवावेत. त्याची सात-बारामध्ये नोंद असणे आणि नमूद केलेल्या क्षेत्राप्रमाणे नुकसानीचे क्षेत्र जुळले पाहिजे, याची खात्री करावी. ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नुकसान झालेल्या शेतजमिनीचे व पिकांचे जीपीएस फोटो किंवा मोबाईल अॅपद्वारे घेतील.

तर, कृषी सहायक प्रत्यक्ष शेतजमिनीची, पीक, फळबागांची पाहणी केल्यानंतर नुकसानीची टक्केवारी व एकूण द्यावी लागणारी रक्कम ठरवतील, असे नियोजन केले आहे. दरम्यान, कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील पंचनामे उद्यापासून केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर हे पंचनामे होतील.’

यादी तयार करताना...

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती आणि फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करताना गावचे नाव, गट नंबर, नुकसानीचा प्रकार, प्रभावित भाग, वितरित रक्कम, शेतकऱ्याचे नाव, आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, बँक शाखा आणि बँकेचा आयएफएससी कोड नंबर द्यावा लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT