Kolhapur Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : वाळव्यात पिकांचे पंचनामे पूर्ण

Kolhapur Flood : वाळवा तालुक्यातील भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

Team Agrowon

Sangli News : वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेलेल्या १ हजार २५ हेक्टर शेतीचे कृषी विभागामार्फत पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती वाळवा तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांनी दिली.

वाळवा तालुक्यातील भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. पुरामुळे तालुक्यातील १ हजार २५ हेक्टर क्षेत्रातील पाण्याखाली गेलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले.

पंचनामे केलेल्या पिकांमध्ये सोयाबीन २३२ हेक्टर, भुईमूग २११, भात १७, भाजीपाला ९, ऊस ५५४, हळद एक हेक्टर, केळीचे एक हेक्टर क्षेत्र आढळून आले आहे. उर्वरित पंचनामेही पूर्ण केले जाणार आहेत. पूरकाळात आठ दिवस उभी पिके पाण्याखाली गेल्याने ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात, केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले.

सतत पाण्यात पिके असल्याने ती कुजून जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न पूरपट्ट्यात निर्माण झाला आहे, चारापिकेही पाण्याखाली गेल्याने ती कुजू लागली आहेत. काही ठिकाणी नदीकाठच्या शेतीला फटका बसला असून जमीनही खचलेली आहे.

वाळवा तालुक्यात या वर्षी वारणा व कृष्णा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भुईमूग, सोयाबीन, भात, ऊस अशा पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत.
- इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, इस्लामपूर
पुणे-बंगळूर अशियाई ६६ महामार्गामुळे मूळचा पाण्याचा प्रवाह बदलता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतात पावसाचे पाणी शिरून पिकांबरोबर शेत जमिनीचेही नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे केलेल्या शेताचे व पिकांचे अनुदान द्यावे.
- अमोल पाटील, शेतकरी, नेर्ले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT