Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : पंचगंगा नदीने गाठली इशारा पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Panchganga River Water : कोल्हापूर जिल्ह्यात सलग ३ दिवस होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात सलग ३ दिवस होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याने इशारा पातळी गाठली असल्याने जिल्हा प्रशासन विभाग सतर्क झाला आहे. धरणक्षेत्रातही पावसाची दमदार बरसात झाल्याने ओढे नाले तुडूंब भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी ११ वाजता ३९ फुटांवर पोहोचली. दरम्यान पुढच्या २४ तासांत असाच पाऊस झाल्यास पंचगंगा नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता आहे.

मागच्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात २८.४ मिमी पाऊस पडला आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८.४ मिमी पाऊस पडला. ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

शहरातील संभाव्य पूरप्रवण भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहाणी केली. तावडे हॉटेल परिसरातील ८० लोकांना शाहू सांस्कृतिक भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे; तर सुतारवाडा परिसरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राधानगरी धरणातून १४५० क्युसेकने पाणी विसर्ग करण्यात येत आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार

जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले असून, राधानगरी धरण ८० टक्क्यांहून अधिक पाणी भरले आहे. रविवारी दिवसभारत ७३ मिमी पावसाची नोंद झाली, राधानगरी धरणात ६६३१, २० द.ल.घ.मी. पाणी साठा असून ३३७.८० फूट पाणी पातळी झाली आहे. जून महिन्यापासून ते २१ जुलैपर्यंत २,३३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आज राधानगरी धरणातील वीजनिर्मिती केंद्रातून १४५० क्युसेस विसर्ग भोगावती नदी पात्रात चालू आहे. पाणी स्वयंचलित दरवाजांपर्यत आले आहे. पावसाचा जोर सोमवारी देखील राहिल्यास दरवाजे उघडू शकतात.

रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु

कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, शाहूवाडी तालुक्यात मलकापूर शेजारी, जाधववाडी येथे 2 फूट पाणी आले होते. तेथील पाणी उतरले असुन कोल्हापूर रत्नागिरी वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे.

धरणक्षेत्र परिसरात अतिवृष्टी कायम

राधानगरी तालुक्यामध्ये आणि सर्व धरणक्षेत्र परिसरात अतिवृष्टी कायम आहे. काळम्मावाडी धरणही वेगाने भरत आहे. आजही पावसाचा जोर कायम आहे. असाच जोर राहिल्यास पुढच्या ५ दिवसांत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढला असून यामुळे सर्व धरणाची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा पाऊस अधिक असून राधानगरी ८ टक्के तर काळम्मावाडी पाणीसाठा २५ टक्के अधीक आहे. दाजीपुरात १३८ मिलिमीटर पाऊस झाला.

वारणा धरण सतर्कतेचा इशारा

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन आज (ता.२२) रोजी पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणातून येत्या चौवीस तासात वक्र द्वाराद्वारे केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT