Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

International Flower Market : पणन मंडळ पुण्यात उभारणार आंतरराष्ट्रीय फुलबाजार

Panan Mandal : फूल उत्पादनाचे क्लस्टर निर्माण झालेल्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फूल निर्यातीला आता बूस्टर मिळणार आहे.

गणेश कोरे

Pune News : फूल उत्पादनाचे क्लस्टर निर्माण झालेल्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फूल निर्यातीला आता बूस्टर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ तळेगाव दाभाडे येथे आंतरराष्ट्रीय फूल बाजार उभारणार आहे. यासाठी अपेडाने तत्त्वतः मंजुरी दिली असून, अंतिम प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना पणन मंडळाला दिल्या आहेत.

याबाबत मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम म्हणाले,‘‘पणन मंडळाच्या वतीने फ्लोरिकल्चरला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी पणन मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने तळेगाव फ्लोरिक्चर पार्क उभारण्यात आले आहे. तर मावळ तालुक्यात देखील फ्लोरिकल्चर रुजले असून मावळ तालुका आणि तळेगाव दाभाडे हा त्याचे हब झाले आहे.

फ्लोरिकल्चर मधील सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने इंडो डच सहकार्याने राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेत स्वयंचलित ‘एक्सलन्स इन फ्लोरिकल्चर सेंटर देखील उभारण्यात आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.’’

‘‘शासनाने दिलेल्या विविध सोयी सुविधांमुळे फ्लोरिक्लचर निर्यात केंद्र झाले आहे. मात्र शेतकऱ्यांना आणि निर्यातदारांना याठिकाणी निर्यात सुविधा केंद्र आणि जागेवरच लिलाव सुविधा नव्हती. याबाबत शेतकरी आणि निर्यातदारांची अत्याधुनिक लिलाव केंद्राची मागणी होती.

याबाबत फ्रान्सच्या मझार या कंपनीकडून आंतरराष्‍ट्रीय बाजार उभारणी बाबत प्रकल्प अहवाल बनवून घेतला. या अहवालात राज्यातील कट, आणि लूज फूल उत्पादनाचा आढावा घेत ५ एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय फूलबाजाराचा प्रकल्प सादर केला आहे.

नेदरलॅंड देश फूल उत्पादनासाठी अग्रेसर आहे. अल्समीर हा आंतरराष्ट्रीय फूल बाजार प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर कार्यप्रणाली असणारा तळेगाव येथील आंतरराष्ट्रीय फूलबाजार आहे. या ठिकाणावरून दररोज ५ लाख फुलांची हाताळणी आणि निर्यात होईल. यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, १०० टक्के अर्थसाहाय्य ‘अपेडा’चे असेल.
- संजय कदम, कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे.
निर्यातक्षम फूल उत्पादन करूनही सोयी-सुविधांअभावी निर्यातीसाठी शेतकरी आणि निर्यातदारांना अडचणी येत होत्या. त्यामुळे तळेगाव येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूल लिलाव केंद्र उभारण्याची मागणी करत होतो. आता हा प्रकल्प साकारत असल्याचे समाधान आहे. याचा फायदा पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होईल. देशभरातील निर्यातदार या ठिकाणी येऊन थेट खरेदी करू शकतील.
- सचिव, तळेगाव दाभाडे फ्लोरिकल्चर पार्क फूल उत्पादक सहकारी संस्था.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT