Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : कोल्हापूर, सांगली‍तील कारखान्यांवर ‘स्वाभिमानी’तर्फे १७ पासून पदयात्रा

Sugarcane Season : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्‍या उसाचा ४०० रुपयांचा हप्ता द्यावा यासाठी साखर कारखान्यांच्या दारात पायी जाऊन आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता. २) दिली.

Team Agrowon

Kolhapur News : साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्‍या उसाचा ४०० रुपयांचा हप्ता द्यावा यासाठी साखर कारखान्यांच्या दारात पायी जाऊन आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता. २) दिली. आम्ही दिलेल्या मुदतीत ही रक्क्म न दिल्‍याने मंगळवारी (ता. ३) दोन्ही जिल्ह्यांतील साखरेची वाहतूक अडवणार असल्याचेही शेट्टी यांनी या वेळी जाहीर केले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांवर १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ही पदयात्रा निघेल. ७ नोव्‍हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता होईल. याच परिषदेत यंदाच्या हंगामात कोणती भूमिका घ्यायची हा निर्णय होईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर सोमवारी (ता. २) ‘स्वाभिमानी’च्या वतीने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कारखान्यांवर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी पुढील आंदोलनाची घोषणा केली.

ते म्हणाले, गेल्‍या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हफ्ता प्रतिटन ४०० रुपये द्यावा ही आमची मागणी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत तसेच उसापासून होणाऱ्या उपपदार्थांचेही दर वाढल्याने साखर कारखानदारांना यंदा ४०० रुपये जास्त भाव देण्यास सहज शक्य आहे.

पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ४०० रुपये जादा दर देऊन हे सहज शक्य असल्याचे अगोदरच सिद्ध केले आहे. कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अन्य कारखानदारांनी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने आम्ही आंदोलनाची पुढची दिशा म्हणून आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत.

२२ दिवस आत्मक्लेश करणार

प्रत्येक वर्षीच्या गाळप हंगामात कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय आम्ही ऊस परिषदेत घेत असतो. यंदाची ऊस परिषद ७ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होईल. या परिषदेदिवशी पदयात्रेचा समारोप होईल. पदयात्रेच्या काळात मी स्वत: कोणतेही वाहन वापरणार नाही. यंदाची ऊस परिषद २२ वी आहे. हे औचित्य साधून २२ दिवस आत्मक्लेश करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT