Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : धान खरेदीचे उद्दिष्ट चार लाख क्‍विंटलने वाढले

Dhan Kharidi : भंडारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या १२ लाख क्‍विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट संपुष्टात आले. परिणामी अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

Team Agrowon

Bhandara News : भंडारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या १२ लाख क्‍विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट संपुष्टात आले. परिणामी अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी त्यांच्याकडून होत होती. त्याची दखल घेत जिल्ह्याला चार लाख क्‍विंटलचे अतिरिक्‍त उद्दिष्ट देण्यात आले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने यंदाच्या हंगामात उन्हाळी धान खरेदीकरिता अनेक नियम आणि अटी लादण्यात आल्या आहेत. परिणामी उन्हाळी धान खरेदी वारंवार प्रभावित होत आहे.

वेळेवर खरेदी केंद्र सुरू न होणे, बारदान्याची समस्या निर्माण होणे, गोदाम समस्या, हमाल व हमाली दर आकारणी, यांत्रिक सोयीसुविधा, खरेदी केंद्रांकडील सुरक्षा रक्‍कम, खरेदीतील तूट, गोदाम, डीओ अशाप्रकारच्या समस्यांचा त्यात समावेश आहे.

या साऱ्या समस्यांमुळे खरेदी प्रभावित झाली. अशातच १२ लाख क्‍विंटलचे उद्दिष्ट पूर्णत्वास गेल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने आपला धान विकता आले नाही. परिणामी, शेतकऱ्यांची मागणी आणि गरज लक्षात घेता जिल्ह्याला चार लाख क्‍विंटलचे अतिरिक्‍त धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

उन्हाळी धान खरेदीकरिता उद्दिष्ट चार लाख क्‍विंटलने वाढविण्यात आले आहे. परंतु परवानगी देताना संबंधित खरेदी केंद्रांची सुरक्षा रक्‍कम व इतर बाबींचा आढावा घेत केंद्रांना परवानगी दिली जाणार आहे.

त्यामध्ये अ दर्जाच्या संस्थांचा प्रामुख्याने विचार होईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. धानाचे चुकारे देखील शेतकऱ्यांना वेळेत होतील, यावर भर दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT