Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : परतीच्या पावसाने भातकापणी लांबणार

Retreating Rain : यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच तरारली आहे; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Alibaug News : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील सुधागड-पाली, माणगाव, खालापूर येथे मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणथळ जागेतील खाचरात पाणी वाढल्याने भाताच्या लोंब्‍या आडवी होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

तयार होत आलेल्या भातपिकाला पाण्याची फारशी गरज नसते, मात्र शेतात पाणी भरल्‍याने कापणी लांबण्याची तसेच कीड प्रादुर्भावाची शक्‍यता आहे. यंदा समाधानकारक पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच तरारली आहे; मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

घाटमाथ्यावर झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे नद्यांच्या पात्रातही वाढ झाली आहे. भातशेतीत पाणी साचल्‍याने हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याची भीती आहे. सध्या शेतकऱ्यांकडून भातपीक कापण्याची तयारी सुरू आहे. यासाठी कापणीच्या साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. परंतु पावसाने कापणीचे नियोजन बिघडले आहे.

कापणीच्या वेळी शेतात पाणी राहिल्‍यास कडपा व्यवस्थित ठेवता येत नाही. ओंब्या पाण्यात भिजल्याने दाणा खराब होतो, त्याचबरोबर चिखलात कापणी करण्यासाठी जादा मनुष्यबळ लागते.

भाजीविक्रेत्‍यांना फटका

काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली; अवघ्‍या काही तासांत पावसाने रौद्ररूप धारण केल्‍याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसामुळे छोटे-मोठे व्यावसायिक तसेच भाजीविक्रेत्‍यांना पावसाचा मोठा फटका बसला. पावसाची तीव्रता इतकी होती की, नदी, नाले काही तासांत दुथडी भरून वाहू लागले.

कापणीदरम्यान खाचरामध्ये पाणी कमीत कमी असावे लागते. त्यामुळे कापलेला भात व्यवस्थित वाळत ठेवता येतो; परंतु पाणी जास्त असल्यास भात वाळत ठेवता येत नाही.
- गणेश भगत, शेतकरी, रोहा
तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात शेतीचे फारसे नुकसान झालेले नाही; परंतु भातकापणीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
- सतीश बोराडे, प्रभारी कृषी उपसंचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT