Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : पावसाची उघडीप; भातपीक कापणीला वेग

Rain Update : सिंधुदुर्गात ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली आहे. यातील पाच ते सहा हजार लागवड पहिल्या टप्प्यात झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात दुपारपर्यंत पावसाची उघडीप मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला गती आणली आहे. असे असले तरी भातपीक जमिनीवर कोसळल्यामुळे कापणी करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्केच भातपीक कापणी झाली आहे.

सिंधुदुर्गात ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली आहे. यातील पाच ते सहा हजार लागवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. हे सर्व भातपीक परिपक्व झाल्यानंतर एक महिना उलटला आहे. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना अजिबात भातपिकाची कापणी करता आली नाही.

केवळ मोजक्या शेतकऱ्यांनी किरकोळ कापणी केली आहे. दरम्यान काल दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपीक कापणी केली. त्यानंतर गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या.

परंतु शुक्रवारी सकाळपासून पुन्हा पावसाने उघडीप दिली होती. दुपारी तीन चार वाजेपर्यंत पाऊस उघडीप देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीचा वेग वाढविला आहे.एकीकडे शेतकरी भातपीक कापणीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न करीत असले तरी वादळीपाऊस आणि परिपक्व होवुन महिना उलटल्यामुळे अनेक भागातील पिके जमिनीवर कोसळली आहेत.

या पिकांची कापणी मशिनद्वारे करता येत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना कापणी करताना सुद्धा भातांची लोंबी जमिनीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पिकांची कापणी करताना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत केवळ ५ टक्के पिकांची कापणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT