Paddy Harvesting : पावसाचा अंदाज घेत भात कापणीची कामे सुरू

Rain Forecast : ग्रामीण भागात भातमळणीची कामे जोरात सुरू आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.
Paddy Harvesting
Paddy HarvestingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ग्रामीण भागात भातमळणीची कामे जोरात सुरू आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनोत्तर पाऊस कधी थांबतोय याचा अंदाज घेतला जात आहे. परतीचा पाऊस पिकांचे नुकसान करू लागल्याने बळीराजा काळजीत पडला आहे.

कागल तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५४ हजार ७५४ हेक्टर आहे. यातील ४६ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. २५ हजार ९२० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे, तर उर्वरित १९ हजार २०० हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी केली आहे. चालू वर्षी पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने पिकांची चांगली वाढ झाली.

Paddy Harvesting
Paddy Crop Damage : मुळशी तालुक्यात पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

तालुक्यात ९ हजार हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भात आणि २ हजार ५०० हेक्टरमध्ये भुईमुगाची लागवड केली आहे. पिकांची काढणी सुरू असतानाच मॉन्सूनोत्तर पावसाने बाधा निर्माण केली आहे.

Paddy Harvesting
Paddy Crop Damage : काढणीस आलेल्या भात पिकांचे पावसाने नुकसान

पहिले प्राधान्य भात कापणीला

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने विद्यमान आमदारांसह मतदार संघातील संभाव्य उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील लोक मळणीच्या कामात गुंतल्याने प्रचाराचे काम जरा दमानेच केले जात आहे.

शेतकरीही मॉन्सूनोत्तर पावसाचा अंदाज घेऊन मळणीची काम करत आहेत. शेतातून घरी परतल्यावरच विरंगुळा म्हणून होऊ घातलेल्या निवडणुकीचा अंदाज बांधण्यात व्यस्त होऊ लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com