Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भात कापणीला ब्रेक

Paddy Production : वैभववाडी, कणकवली, कुडाळ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. नापणे येथे एका घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (ता. १५) सायकांळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. वैभववाडी, कणकवली, कुडाळ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

नापणे येथे एका घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले. या पावसामुळे नुकत्याच सुरू झालेल्या भातपीक कापणीला ब्रेक लागला असून कापणी केलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून उष्मा वाढला होता. दुपारपर्यंत कुठेही पाऊस झाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली होती. त्यानंतर सायकांळी चारच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागांत विजांचा कडकडाट सुरू झाला. कणकवली तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कणकवली शहरात जोरदार पाऊस सुरू होता. अर्धातास पावसाने शहराला झोडपून काढले. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातदेखील विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

तालुक्यातील नावळे, सडुरे, अरूळे, निमअरूळे या गावांमध्ये जोरदार पाऊस सुरू होता. वैभववाडी शहर परिसरात ४० मिनिटे मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे नापणे, कोकाटेवाडी येथील अंजली खाड्ये यांच्या घरावर झाड कोसळले. या पावसामुळे भात कापणीला ब्रेक लागला आहे.

दोन दिवस पावसाचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी असा दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT