Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : दिंडोरीत भात लावणी अंतिम टप्प्यात

Paddy Cultivation : दिंडोरी तालुक्यात सर्वच भागात भिज पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीच्या अंतिम कामाला वेग आला आहे.

Team Agrowon

Dindori News : तालुक्यात सर्वच भागात भिज पावसाने हजेरी लावल्याने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात लावणीच्या अंतिम कामाला वेग आला आहे. यावर्षी मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर सूर्याचा पुष्य नक्षत्राने गेल्या रविवारी (ता.२१) मध्यरात्री पासून भीज पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगाम बऱ्यापैकी येऊ शकेल असा अंदाज आहे.

दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील जानोजी, खेडगाव, वणीकसबे, राजापूर, जोपुळ, पालखेड, आंबे, वरवंडी, गणेशगाव, खतवड, ढकांबे, जऊळके दिंडोरी, मोहाडी,चिंचखेड, वनारवाडी, गणेशगाव, कुर्णोली, मातेरेवाडी, मावडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पावसाने समाधान आहे. पावसामुळे धरणांमध्ये व विहिरींमध्ये असलेल्या पाण्यात वाढ झाली आहे. मात्र नदी

नाल्यांना पूर येण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पश्चिम पट्यातील भनवड चारोसा लखमापूर जांबुटके, उमराळे, वणीखुर्द, गांडोळा, निगडोळ, करंजवण, खेडले कोशिंबे वारे वनारे परिसरात या पावसामुळे भात नागली वरई आदीची लागवड आता अंतिम टप्प्यात सुरू आहे.

पूर्व पट्ट्यात भुईमूग, सोयाबीन

पूर्व भागात भुईमूग सोयाबीन पेरणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. अंतर्गत मशागतीत द्राक्ष बागेत तण काढणे, फवारणी करणे, रासायनिक खते पिकांना देणे आशा कामाला वेग आला आहे. तालुक्यात पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले आहेत तरीही नदी नाले अध्याय कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना रिमझिम पावसाला सामोरे जावे लागले असून पाणी पातळी तीन ते चार फूट ओल गेली आहे. त्यामुळे अजूनही या भागात समाधान कारक पावसाची अपेक्षा आहे.

धरणांना प्रतीक्षा

पालखेड, ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव, वाघाड, करंजवण या धरणांत पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. पश्चिम पट्ट्यातील भागात भात लावणीच्या कामाला अंतिम टप्प्यात वेग आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief Package: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी आल्यास...; बावनकुळे असे का म्हणाले?

Farmer Relief : आमदार पवारांकडून बाराशे अतिवृष्टिग्रस्तांना सव्वा कोटी मदत

Farmers Protest: बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार

Farmer Relief : पीकविमा न भरलेल्यानांही भरपाई देण्याचे प्रयत्न

Bacchu Kadu: कर्जमाफी, नुकसान मदतीसाठी सरकार अपयशी; बच्चू कडू यांची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT