Paddy Farming : भातलावणीचे काम अंतिम टप्प्यात

Paddy Cultivation : नदी, नाले ओसंडून वाहत असून शेतकऱ्यांची शेतीदेखील पाण्याने भरली आहे. अनेक ठिकाणी भातलावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने बळीराजा खूश झाला आहे. यावर्षी उशिराने पावसाला सुरुवात झाली. परिणामी, पेरणीला उशीर झाला. त्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भातरोपे उशिरा झाली होती. आता नदी, नाले ओसंडून वाहत असून शेतकऱ्यांची शेतीदेखील पाण्याने भरली आहे. अनेक ठिकाणी भातलावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

सध्या हवामानात बदल झाला असून बेभरवशाच्या या पावसात भातशेती करणे म्हणजे मोठे दिव्यच असते; पण सध्या चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील ९० टक्के शेतकरी लावणी करण्यासाठी लगबग करत आहेत. मजुरांची कमतरता असल्याने एकमेकाला मदत करत भातलावणीची कामे केली जात आहेत.

Paddy Farming
Paddy Farming : भातशेती, मीठ उत्पादन धोक्यात

भाताच्या विविध जाती, तसेच आधुनिक लागवडीचे प्रयोग शेतकरी करत आहेत. बी-बियाणे, खत, मजुरी वाढलेली असली तरी कुटुंबासाठी अनेक शेतकरी भातशेती करण्याकडे उतरत आहेत. कारण भातशेती केल्यावर जेवढे उत्पन्न मिळते, त्याच्यापेक्षा जास्त खर्च होत असल्याने अनेक शेतकरी शेती करण्यास कचरत आहेत.

Paddy Farming
Paddy Cultivation : पसुरे परिसरातील भात लावण्या लांबणीवर

यांत्रिकीकरणामुळे भातशेतीचे क्षेत्र वाढणार!

बोर्डी : गेल्या वर्षी शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीची प्रात्यक्षिके दाखवून कमी खर्चात शेती करण्याचे धडे देण्यात आले. तसेच चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी यांत्रिक शेतीचा कास धरून भातशेती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी ग्रामीण भागात पुन्हा एकदा भातशेतीला चांगले दिवस येतील, असा विश्वास श्री गिरी वनवासी प्रगती मंडळातर्फे व्यक्त केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने होणारी भातशेती खूप खर्चिक असल्याने परवडत नाही. बदलत्या काळानुसार यांत्रिक शेती करणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून यंत्राद्वारे भातलावणीचे प्रात्यक्षिक संस्थेकडून दाखवण्यात येत आहे.

माझी वडिलोपार्जित शेती आहे; यासाठी मोठा खर्च करावा लागतो. स्वतःला वर्षभरात लागणारे तांदूळ मिळतात. वाढत्या महागाईमुळे आता भातशेती करणे परवडत नाही. विकत घेतलेले तांदूळ परवडत असूनदेखील परंपरा जपण्यासाठी भातशेती करत आहे.
पंढरी पाटील, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com