Paddy farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : मुरूड तालुक्यात तरारली भातशेती

Team Agrowon

Latest Agriculture News : मुरूड तालुक्यामध्ये प्रामुख्याने भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे ३२०० हेक्टर भात क्षेत्र लागवडीखाली आहे. सध्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भातशेती तरारली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या भातशेती पसवली असून, हळवे भात १५ ऑक्टोबरपर्यंत, तर गरवे भात ऑक्टोबरअखेरपर्यंत काढणीस तयार होईल, असे शेतकरी म्हणत आहेत.

मुरूड तालुक्यात मुख्यत्वे जया, सुवर्णा, रूपाली, शुभांगी, चिंटू, वाडा, कोलम इत्यादी भात वाणांचे उत्पादन घेतले जाते. तसेच पाणथळ, खार जमिनीत नवीन संशोधित केलेल्या पनवेल-१, २, ३ या वाणांची लागवड केली जाते.

उथळ किंवा उखारू जमिनीमध्ये हळव्या वाणांची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. भाताचे हळवे वाण हे ९५ ते ११० दिवस, तर निमगरवे वाण ११० ते १३० दिवस आणि गरवे वाण १३० ते १४५ दिवस याप्रमाणे भात पीक तयार होण्यासाठीचा कालावधी लागतो.

गेल्या वर्षी चांगला पाऊस आणि योग्य हवामानामुळे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले होते. यावर्षी सुद्धा उत्पादन चांगले मिळण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २४५० मि.मी. पावसाची नोंद मुरूड तालुक्यात झाली आहे. ऑक्टोबर २०२२ अखेर पावसाने ३००० मि.मी इतक्या विक्रमी पावसाचा टप्पा गाठला होता. या पावसाने सप्टेंबरअखेर दमदार हजेरी लावल्याने निमगरवे व गरवे भाताची कापणी ऑक्टोबरमध्ये होईल, असा होरा आहे.

पीकविमा एक औपचारिकता

यंदा पंतप्रधान पीकविमा योजना केवळ एक रुपया इतका नाममात्र आकाराचा गाजावाजा झाला आहे. तरी तालुक्यात केवळ १८८९ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. गेल्या वर्षी पीकविमा काढण्याचे प्रमाण तीन टक्के होते. या वर्षी ते ९.२९ टक्के झाले आहे.

पीकविम्याचे प्रमाण का वाढत नाही, याविषयी प्रगतशील शेतकरी मनोज कमाने यांना विचारले असता, जिल्ह्यात सरासरी भात उत्पादकता ही ५० टक्क्यांपेक्षा नेहमीच जास्त भरते. महसुल विभागाकडून केलेल्या पाहणीचा अहवाल हा ग्राह्य धरण्यात येतो. परिणामी, पीकविमा एक औपचारिकता ठरते; मात्र विमा काढणाऱ्या कंपनीकडून आतापर्यंत पै देखिल मिळाला नाही, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT