Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भात पिके निसवण्याच्या अवस्थेत

Sandeep Navle

Pune News : सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात पिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या अवस्थेत असून लवकर लागवड झालेली भात पिके निसवण्याच्या अवस्थेत आहेत. आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे भाताचे चांगले उत्पन्न हातात येण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे.

जूनच्या अखेरीस जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत भात रोपे टाकली. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे रोपांच्या लागवडीला वेग आला. तर जुलै अखेरीस जवळपास सर्वच भागात भात लागवडी उरकल्या होत्या.

जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. यंदा लवकर पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय? असा प्रश्न उपस्थित राहू लागला होता.

पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी रोपवाटिका टाकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. त्यामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.

पुणे जिल्ह्याच्या भात पट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ५९ हजार ६२९ हेक्टर म्हणजेच १०० टक्के भाताच्या पुर्नलागवडी झाल्या होत्या. परंतु ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे भात पिके काही प्रमाणात अडचणीत आली होती. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होती. परंतु सप्टेंबरच्या अखेरीस पडलेल्या दमदार पावसामुळे भात पिकांना आधार मिळाला. सध्या बहुतांश भागात भात पिके निसवण्याच्या स्थितीत आहेत.

भाताच्या विविध वाणांच्या लागवडी

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात बियाणांच्या लागवडी करत आहे. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाणांच्या वाणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मावळसह भोर, मुळशी तालुक्यात पारंपरिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT