Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : वीसगाव खोऱ्यात भात पिकास फटका

Paddy Crop : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव तसेच आंबवडे खोऱ्यात गुरुवारी (ता ३१) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Pune News : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव तसेच आंबवडे खोऱ्यात गुरुवारी (ता ३१) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाच्या वतीने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

वीस गाव खोऱ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसाळा बरोबर सोसाट्याचा वारा देखील वाहत होता.

यामुळे भात खाचरात काढणीसाठी आलेले भाताचे पीक भुईसपाट झाले. काही शेतकऱ्यांची भात काढणी सुरू होती. खाचरातील उभ्या पिकासोबत कापलेल्या भाताचेही नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे विसगाव खोऱ्यातील वरोडी खुर्द , वारोडी बुद्रुक, वरोडी डायमुंख , आंबाडे, पाले, बालवडी, नेरे, गोकवडी, बाजारवाडी, हातनोशी, पळशोसी, धावडी आणि अंबावडे खोऱ्यातील चिखलगाव, रावडी कर्नावड, कोर्ले व टिटेघर या गावातील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असले तरीही संबंधितांनी गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी यांना नुकसानीचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- राजेंद्र भोर, तहसीलदार
अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले भाताचे पीक वाया गेले. शासनाने लवकर पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.
- प्रभाकर वरे, शेतकरी वरळी खुर्द

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture : दुष्काळी परिस्थितीत एकात्मिक शेती पद्धत हवी

Agriculture Crisis : पेरणीचा खर्चही निघेना, सांगा जगायचे कसे?

Sugarcane Fire Incident: वीट येथे शॉर्ट सर्किटमुळे ५ एकर ऊस जळून खाक

Amravati Water Supply: अमरावतीला उन्हाळ्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही

Sugar Factory Water Conservation: साखर कारखान्यांनी पाण्याची काटकसर करावी:जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

SCROLL FOR NEXT