Paddy Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसामुळे भाताचे नुकसान

Paddy Harvesting : तीन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील दाणोली परिसराला झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, आर्चिणे, सडुरे, शिराळे, कुर्ली या गावांत वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी (ता. १२) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील काही गावांत वाऱ्यांसह पाऊस झाला. यामुळे भातपीक जमिनीवर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

कापणी वेळेत झाली नाही तर मोठे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. सायंकाळच्या वेळेत हा पाऊस पडत आहे. त्यामुळे भातपिकांचे नुकसान सुरू झाले आहे.

तीन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील दाणोली परिसराला झोडपून काढल्यानंतर गुरुवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, आर्चिणे, सडुरे, शिराळे, कुर्ली या गावांत वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला.

पूर्व पट्ट्यातील गावांत तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली. याशिवाय इतर गावांत देखील मध्यम सरी कोसळल्या.

दरम्यान, पावसामुळे परिपक्व झालेली भातपिके जमिनीवर कोसळली आहेत. त्यामुळे भातपिकांची लोंबी तुटून पडण्याची भीती आहे. जमिनीवर कलंडलेल्या भातपिकांची कापणी लवकर न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

एकीकडे भातपीक झपाट्याने परिपक्व होत आहे. तर दुसरीकडे पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT