Soyabean Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean crop : एका रात्रीत सोयाबीन पडू लागले पिवळे

Soybean crop diseases : नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचे प्रमाण अधिक असल्याने पीक एका रात्रीत पिवळे पडत आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचे प्रमाण अधिक असल्याने पीक एका रात्रीत पिवळे पडत आहे. बुरशीचा प्रसार झपाट्याने होत असल्याने आज हिरवे दिसणारे सोयाबीन दुसऱ्या दिवशी पिवळे पडून वाळत आहे. हा प्रकार जिल्ह्याच्या सर्वच भागात असल्याने शेतकरी उत्पादन घटण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यानी केली आहे. मागील काही वर्षात नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती करताना शेतकऱ्यांना दरवर्षी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधी अतिवृष्टीने तर कधी अनावृष्टीने या नगदी पिकांचे उत्पादन घटत आहे. यंदा पेरणी उशिरा झाल्याने पिकांची वाढ जेमतेम राहिली होती. अशातच मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पंधरा दिवसापेक्षा अधिक काळाचा पावसाचा खंड पडला होता. या अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या‍ शेतकऱ्यांच्या सोयाबीनला यंदा बुरशीजन्य रोगाने गाठले आहे. जिल्ह्यात प्रारंभी काही ठरावीक भागात पीक पिवळे पडून वाळत होते. परंतु याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एका रात्रीत हिरवे दिसणारे सोयाबीनचे पीक दु‍सऱ्या दिवशी पिवळे पडून वाळत असल्याचे चित्र जिल्ह्याच्या सर्वच भागात दिसून येत आहे. परिणामी अपरिपक्व पिक वाळत असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले आहेत. पिवळे पडणाऱ्या पिकावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असलेतरी पिक पक्वतेचा शेवटचा टप्पा असल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत.

जिल्ह्यात सोयाबीन पीक पिवळे पडण्याचे प्रमाण मागील एक महिन्यापासून सुरु आहे. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना उपाय योजना सुचविल्या होत्या. यामुळे ते नियंत्रणात आले होते. परंतु सध्या अनेक ठिकाणी सोयाबीन पिवळे होऊन वाळत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात येत आहे.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT