Drip Irrigation Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Drip Irrigation Subsidy : ठिबकच्या थकीत अनुदानासाठी जिल्हा कृषी कार्यालयास ठोकले टाळे

Agriculture Office Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील ७ कोटी ३६ लाख शासनाकडे थकले आहे. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.

sandeep Shirguppe

Drip Irrigation Kolhapur Subsidy : केंद्र सरकारकडून यंदाच्या वर्षातील ठिबक आणि तुषार सिंचनासाठी असणारे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७ कोटी ३६ लाख शासनाकडे थकले आहे. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यात प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त करत आज(ता.०९) ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकरी कृती समितीकडून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेस आमदार सतेज पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील -सरूडकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, माजी नगरसेवक संदीप नेजदार यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ठिबक आणि तुषार सिंचनासाठी असणारे अनुदान मिळावे यासाठी कोल्हापूर जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयास वारंवार मागणी करूनही याबाबत माहिती मिळत नव्हती. योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.

याबाबत माजी नगरसेवक संदीप नेजदार यांनी अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली होती परंतु अधिकाऱ्यांकडून समाधानकारक सहकार्य मिळत नसल्याने कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी याबाबत म्हणाले की, राज्याचे अंदाजे ९०० कोटींच्या आसपास अनुदान थकीत आहे यातील कोल्हापूर जिल्ह्याचे ७ कोटी ३६ लाख अनुदान प्रलंबीत असून यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच विभागीय स्तरावर अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त व्हावे यासाठी आम्ही पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करत असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.

सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास हेक्टरी ८० टक्के अनुदान देण्यात येते. त्यातील ५५ टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून दिले जाते. तर उर्वरित २५ टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येते. लाभार्थ्यांस केवळ २० टक्के पैसे भरावे लागतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT