Agricultural Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Farming Technology : तीन दिवसांत लाखो जणांनी अनुभवले शेतीचे नवतंत्रज्ञान

Agrotech 2024 : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अॅग्रोटेक २०२४ या कृषी प्रदर्शनाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.

 गोपाल हागे

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अॅग्रोटेक २०२४ या कृषी प्रदर्शनाला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. विशेष म्हणजे प्रदर्शन काळात तीनही दिवस प्रतिकूल हवामान होते. मात्र त्याचा शेतकऱ्यांच्या सहभागावर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. या काळात नवतंत्रज्ञान, पीकवाण, कृषी निविष्ठा, यंत्र-तंत्रज्ञान, पशुधन, पुष्पप्रदर्शन, शेतकरी गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या दालनांवर गर्दी ओसंडून वाहत होती.

मनमोहक पुष्प प्रदर्शन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शास्त्रोक्त कापूस लागवड तंत्रज्ञान, विषमुक्त शेतीचे मॉडेल, पीक वाण, तांत्रिक शिफारशी, शेतीपूरक व्यवसाय तसेच एकात्मिक शेती व्यवस्थापन, पशुपालन, जातिवंत गायी, म्हशी, कोंबड्या, बकरी व बदक पालन, चारा उत्पादन, कमी प्रतीच्या चाऱ्याची मूल्यवृद्धी, दुग्धपदार्थ निर्मिती व विक्री, प्रक्रिया उद्योग,

जांभूळ, केळी, संत्रे, लिंबू, सीताफळ, पपई, पेरू, आवळा आदी फळपिकांचे मूल्यवृद्धी साधण्याचे तंत्र, अभिनव शेती अवजारे, यंत्रे, सूक्ष्म सिंचन पद्धती, ट्रॅक्टर, कापणी पश्‍चात मूल्यवर्धन, पीकेव्ही मिनी डाळ मिल, सीताफळ गर काढणी यंत्र, मिरची बीज निष्कासन यंत्र, ग्रामबीजोत्पादन, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व तण व्यवस्थापनाचे तंत्र जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञान, फळबाग, फुलशेती, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसायांचे विविध व उपलब्ध संसाधनावर आधारित फायदेशीर तंत्रज्ञान, सूक्ष्मसिंचन पद्धती, पाणलोट व्यवस्थापन, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, रोप वाटिका, फळे व दुग्ध प्रक्रिया उद्योग आदी तंत्रज्ञानालाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.

खाद्याची दालने गर्दीने फुलली

अॅग्रोटेकमध्ये असलेल्या विविध गटांच्या खाद्य दालनांवर तीनही दिवस अलोट गर्दी उसळली होती. भरीत भाकरी, ठेचा, मांडे, रोडगे, असे ग्रामीण जीवनाचा भाग असलेल्या खाद्यसंस्कृतीला नागरिकांनी मोठी पसंती दिली. बचत गटांनी तयार केलेल्या विविध पदार्थांनाही मागणी होती. या प्रदर्शनात प्रामुख्याने शेतकरी निर्मित विषमुक्त शेतीमालाची मोठी उलाढालही झाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Harvesting: भात कापणी करताना शेतकरी मेटाकुटीला

Traders Issue: खानदेशात तेंदू पत्ता व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा

Farmer Cup Training: अकोल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फार्मर कपचे प्रशिक्षण

Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत ७३ हजार हेक्टरवर पेरणी

Ativrushti Madat: अतिवृष्टी, महापूर नुकसानीचे ४०९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

SCROLL FOR NEXT