Watershed Management
Watershed ManagementAgrowon

Watershed Management : पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन मूल्यमापनाची पद्धती

Watershed Development : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही राज्यातील यंत्रणा अतिशय सक्षम आहे. या यंत्रणेकडे उपयुक्त अशी तांत्रिक माहिती संकलित केली जाते. पाणलोट क्षेत्रांची कामे झाल्यानंतर विहिरींची, कूपनलिकांची पाणी पातळी निश्चितपणाने वाढते.
Published on

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

Watershed Management Assessment Methodology : पाणलोटक्षेत्र विकासानंतर भूपृष्ठावरील व भूमिअंतर्गत जलसाठांमध्ये निश्चित अशी वाढ होते. जल व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविण्यापूर्वी संकल्पित केलेला जलसाठा वेगवेगळ्या उपचारांच्या माध्यमातून तयार होतो.

याबाबत मूल्यमापनासाठी भूमि संसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी २०१५ मध्ये वेगवेगळे निर्देशांक असणारी नियमावली निर्गमित केली. यामध्ये भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखाली पाणीसाठा यांच्या बाबतीत मूल्यमापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे व शास्त्रीय पद्धती या नियमावलीमध्ये दिल्या आहेत.

मूल्यमापनाची कार्यपद्धती :

उपरोक्त नमूद निर्देशांकानुसार आपण लेखांमध्ये जलशास्त्राशी निगडित काही निर्देशांकाचा उल्लेख व तपासणी पद्धत अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम पाणलोट क्षेत्रांमध्ये उपलब्ध पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर करणे बाबत निर्देशित करण्यात आले आहे. यासाठी रोज (२४ तास) पर्जन्य मिलिमीटर मोजावे. आपल्या आवश्यकतेनुसार त्याचे रूपांतर इतर परिमाणांमध्ये करावे.

नाल्यातील प्रवाह मोजण्यासाठी या निर्देशांकामध्ये पर्जन्य काळात वाहून जाणाऱ्या काही निवडक नाल्यांचा जलप्रवाह मोजण्यासाठी व्ही नॉच किंवा स्टॉफ गॉज वापरण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. याबाबतीमध्ये निवडक नाले असे सूचित करण्यापाठीमागचे कारण असे आहे, की एखाद्या उप पाणलोट क्षेत्राचे सर्व पाणी एका ठिकाणी एकत्र आल्यानंतर मोजमाप करणे आणि त्या आधारे आवश्यक असणाऱ्या उपचारांची तरतूद करणे कधीही हितावह ठरते. या पद्धतीमुळे संबंधित पाणलोट क्षेत्रातून वाहून येणाऱ्या पाण्याचा अंदाज येतो. या पद्धतीमध्ये शक्यतो मॉन्सून पश्चात कमी होणारा प्रवाह म्हणजेच प्रति वर्षी सर्वसाधारण ऑक्टोबर महिना ते त्या त्या पाणलोट क्षेत्रातील प्रवाह आटेपर्यंत आपण नोंद घेणे महत्त्वाचे ठरते. प्रवाह क्युमिक / क्युबिक मीटर प्रति सेकंद या दराने मोजला जातो. त्यानंतर आपण जलप्रवाह वहनाचा प्रतितास देखील दर काढू शकतो.

Chart
ChartAgrowon
Watershed Management
Watershed Development : पाणलोट कामांनी झाला अंबोडाचा कायापालट

व्ही नॉच या पद्धतीमध्ये निवडलेल्या पाणलोट क्षेत्रातील वाहणारा प्रवाह मोजला जातो. यासाठी किंड्स वास्टर कार्टर ( Source- Water measurement Manual, Bureau of Reclamation, United states, २००८) या नावाचे सूत्र वापरले जाते. कृपया वाचक, संशोधक आणि मूल्यमापन यंत्रणांनी या सूत्राचा वापर प्रवाह मोजण्यासाठी करावा. या पद्धतीमध्ये प्रवाहाच्या मिळालेल्या संख्याची मांडणी उपरोक्त सूत्रामध्ये भरल्यानंतर त्या पाणलोट क्षेत्रातून प्रति सेकंद /मिनीट व तास उपलब्ध होणारा प्रवाह आपण क्युबिक मीटर मध्ये काढू शकतो.

आम्ही आमच्या संशोधनामध्ये या कार्यपद्धतीचा वापर केला आहे. त्यासाठी ज्या गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे झाली त्यातील पाच गावे व त्याच पाणलोट क्षेत्रातील पाणलोट क्षेत्राचे उपचार न झालेले गावे विचारात घेतली होती.

Watershed Management
Watershed Development : पाणलोट क्षेत्र विकासातील लोकसहभागाचा निर्देशांक

तक्ता क्रमांक दोन मध्ये याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. दोन्ही ठिकाणच्या उपलब्ध प्रवाहाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केल्यास पाणलोट क्षेत्र विकास झालेल्या तडसर या गावांमध्ये पाण्याचा प्रवाह अपधाव पडल्यामुळे कमी प्रमाणात दिसून येतो, तर तोच अपधाव जलसंधारणाचे कामे न झालेल्या गावांमध्ये अधिकचा दिसून येतो.

प्राथमिकता ही माहिती फारशी विशेष वाटत नाही मात्र पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये ही अतिशय महत्त्वाची ठरते. तडसर या गावी माथा ते पायथा या व्यवस्थापनाने कामे झाली नसल्याचे निदर्शनास आले. कारण २००९ या यावर्षी घेतलेल्या नोंदीमध्ये असे दिसून आले, की गावांमध्ये सलग समतल चर उपचार राबविले गेले असते तर उपरोक्त नमूद प्रवाह आणखी कमी दिसून आला असता. भूपृष्ठांतर्गत जलसाठ्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून आली असती.

Chart
ChartAgrowon

नेर्ली या पाणलोट विकास न झालेल्या गावांमध्ये प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला त्यामुळे असे निदर्शनास आले, की सर्वसाधारण डिसेंबर महिन्यामध्ये येथील प्रवाह आटून जातात. मार्च महिन्यामध्ये पाणीटंचाईस सुरवात होते. भूपृष्ठाकालीन पाणी पातळी मोजण्यासाठी मीटर पट्टीचा वापर केला जातो. याबाबतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही राज्यातील यंत्रणा अतिशय सक्षम आहे.

या यंत्रणेकडे उपयुक्त अशी तांत्रिक माहिती संकलित केली जाते. पाणलोट क्षेत्रांची कामे झाल्यानंतर विहिरींची, कूपनलिकांची पाणी पातळी निश्चितपणाने वाढते. हे पाणी पातळी आपण मीटरपट्टीच्या आधारे मोजतो. पूर्व मॉन्सून पाणी पातळी मे महिन्यामध्ये घेतली जाते, तर मॉन्सून पश्चात ऑक्टोबर महिन्यामध्ये दुसरी पाणी पातळी घेतली जाते. वर्षभरामध्ये जेवढा जलसाठा वापरला जातो त्यास भूजलातील पाणी पातळीमध्ये आढळणारे स्थित्यंतर असे म्हटले जाते. उपरोक्त नमूद निर्देशांक क्रमांक चार पाच सहा याबाबत आपण पुढील लेखात विस्तृत माहिती घेणार आहोत.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे)

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com