PM Awas Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Housing Scheme : सोलापूर जिल्ह्यात ६२ हजार ९५० घरकुले मंजूर

PM Awas Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे, हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला २० लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे.

Team Agrowon

Solapur News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे, हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला २० लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा टप्पा- २ सुरू झालेला असून, चालू आर्थिक वर्षात या योजनेतून ६२ हजार ९५० घरकुले मंजूर केलेली आहेत.

बेघर लाभार्थ्यांचा आवास प्लस २०२४ चे सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड, पोलिस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार देवेंद्र कोठे, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, पोलिस उपायुक्त अजित बोराडे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरकुल लाभार्थ्यांना निधीची कमतरता भासत होती, अशा वेळेस मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना राज्य हिस्स्यामधून ५० हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ३५ हजार रुपये घरकुल बांधकामासाठी व १५ हजार रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण २ लाख ८ हजार अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे. या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी लवकरच सुरू होत आहे. परंतु प्रशासनाने शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा देण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.

वार्षिक योजनेतून ९३४ कोटीचा निधी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून, जवळपास ९९.७४ टक्के निधी खर्च झाला आहे, तर जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ९३४ कोटी २८ लाखाचा निधी मंजूर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT