Rural Housing Scheme : घरकुल बांधकामासाठी १० हजार बेघरांना मिळेना जागा

PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मंजूर झालेल्यांना लगेचच १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. बांधकाम सुरू होऊन पाया पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता तर लिंटल लेव्हलपर्यंत बांधकाम झाल्यावर तिसरा आणि काम पूर्ण झाल्यावर शेवटचा चौथा हप्ता मिळतो.
Pm Awas Scheme
PM Awas Scheme Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील ६२ हजार बेघर लाभार्थींना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता महिन्यापूर्वी मिळाला. पण बांधकाम साहित्य महागले, मोफत वाळू मिळत नसल्याने सुमारे १० हजार लाभार्थींना बांधकामेच सुरू केलेली नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यातील नऊ हजार ७०० लाभार्थींना स्वप्नातील घर बांधकामासाठी स्वत:ची जागा नाही. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मंजूर झालेल्यांना लगेचच १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. बांधकाम सुरू होऊन पाया पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता तर लिंटल लेव्हलपर्यंत बांधकाम झाल्यावर तिसरा आणि काम पूर्ण झाल्यावर शेवटचा चौथा हप्ता मिळतो. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार (डीएसआर) २६९ चौरस फूट घरकुल बांधकामासाठी दोन लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

Pm Awas Scheme
PM Housing Scheme : सोलापुरात ६२ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वितरण

पण, सध्या घरकुलासाठी सरकारकडून अवघे एक लाख २० हजार रुपयेच मिळतात. हे अनुदान दोन लाख रुपये करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच जाहीर केले.

Pm Awas Scheme
Rural Housing Scheme : अहिल्यानगरमध्ये नव्याने होणार ८३ हजार घरकुले

पण त्यासंदर्भातील शासन आदेश अजूनही निघालेला नाही. दुसरीकडे गायरान जमिनी सोडून महाराष्ट्र शासनाच्या जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या जागा बेघर कुटुंबांना घरकूल बांधकामासाठी देण्याचे नियोजन आहे. पण, त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही.

वाळूच्या दोन ठेक्यांचा निर्णय पेन्डिंगच

जिल्ह्यातील उचेठाण व माचणूर या दोन वाळू ठेक्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यास तेथील वाळू घरकूल लाभार्थींना मोफत मिळू शकते. शासनाचे वाळू धोरण अजूनही निश्चित नसल्याने जिल्ह्यातील खानापूर, कुडल, देवीकवठे (ता. अक्कलकोट), मिरी- ताडोर (मोहोळ-मंगळवेढा), बाळगी, भंडारकवठे, लवंगी (ता. दक्षिण सोलापूर), माळेगाव, आलेगाव बु., टाकळे टें., गारअकोले (माढा), आव्हे, नांदोरे (ता. पंढरपूर) अशा ११ ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. या ११ ठिकाणी दोन लाख ब्रासहून अधिक वाळू आहे. वाळूचे लिलाव बंद असल्याने अनेक लाभार्थींनी घराचे बांधकाम सुरू केलेली नाहीत, अशीही स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com