Mahavitaran News Sambhajinagar: छतावर सौर ऊर्जानिर्मिती करून ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणारी पीएम-सूर्यघर योजना केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेला गती देऊन सौर ग्राहकांना तत्पर सेवा द्या, असे निर्देश महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी दिले..सहव्यवस्थापकीय संचालक श्री. जीवने (भाप्रसे) यांनी बुधवारी (ता.२९) छत्रपती संभाजीनगर शहर तसेच जिल्ह्यातील सूर्यघर योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले..Solar Pump Scheme: मध्य प्रदेशचे वर्षभरात २ लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट.बैठकीस छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे यांच्यासह ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे पदाधिकारी व एनसीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते..PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान सूर्यघर मोफतवीज योजनेत महाराष्ट्र प्रथम.श्री. जीवने (भाप्रसे) म्हणाले, सूर्यघर योजनेतील प्रलंबित नेट मीटर तातडीने बसवा. यातील अनुशेष भरून काढा. योजनेच्या सर्व कालमर्यादा कसोशीने पाळा आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाची पूर्तता करा..कोणत्याही परिस्थितीत ज्येष्ठता डावलू नका, जेणेकरून कामात पारदर्शकता व कार्यक्षमता येईल. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना वेळेत, विनासायास व सर्वोत्तम सेवा द्या, असे निर्देश त्यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.