Rural Housing Scheme : घरकुलांची बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत

Government Housing Scheme : गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी यांनी चांगले काम केल्याने जळगाव जिल्ह्याने घरकुल मंजुरी व बांधकामे पूर्णत्वाच्या कामात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे.
Rural Housing Scheme
Rural Housing SchemeAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी यांनी चांगले काम केल्याने जळगाव जिल्ह्याने घरकुल मंजुरी व बांधकामे पूर्णत्वाच्या कामात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. गावाने गावपातळीवर गावाच्या विकासाची भूमिका घेणे, हा खऱ्याअर्थाने पंचायतराज व्यवस्थेचा उद्देश आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात सुरू असलेल्या घरकुल बांधकामाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी येत्या काळात काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात गुरुवारी राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Rural Housing Scheme
Rural Housing Scheme : घरकुल बांधकामासाठी १० हजार बेघरांना मिळेना जागा

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील,

Rural Housing Scheme
Rural Housing Scheme : घरकुल निर्मितीत अकोला दुसऱ्या स्थानी

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी, समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, कृषी विकास अधिकारी पदमनाभ म्हस्के यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात हागणदारी मुक्ती, सुंदर गाव योजना, घरकुल यांसह शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांना सीईओ करनवाल यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

‘ॲप’ लवकरच

घरकुलाच्या कामांची स्थिती दर्शविण्यासाठी लवकरच जळगाव जिल्हा परिषद स्वतंत्र ऍप विकसित करीत आहे. या ऍपमुळे घरकुल बांधकामाची नेमकी परिस्थिती कळू शकणार आहे. त्यासोबतच हप्ते वितरित करणे सोपे होणार आहे. त्यामुळे सर्व गावांनी बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण कशी करता येतील, याबाबतची दक्षता घेण्याचे आवाहनही सीईओ करनवाल यांनी यावेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com