Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : शेतकरी ओळखपत्रासाठी परभणी जिल्ह्यात ५७ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

Unique Farmer Identification Number: प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी अॅग्रrस्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत शुक्रवार (ता. ७) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ५२७ पैकी ५७ हजार ३९५ शेतकरी खातेदारांनी (९.५४ टक्के) नोंदणी केली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट  शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी अॅग्रrस्टॅक या डिजिटल उपक्रमांतर्गत शुक्रवार (ता. ७) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ५२७ पैकी ५७ हजार ३९५ शेतकरी खातेदारांनी (९.५४ टक्के) नोंदणी केली आहे.

२८ फेब्रुवारी पर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु सर्व संबंधित विभाग, यंत्रणा यांच्याकडून शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल जागृती केली जात नसल्यामुळे शेतकरी नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

शेतकरी ओळख क्रमांकामुळे (फार्मर आयडी) पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास साह्य मिळेल. पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड,कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करून घेण्यात सुलभता राहील.

पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकरी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल. लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही.शेतकऱ्यांना वेळेवर कृषिविषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल.

परभणी जिल्हा अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी स्थिती
तालुका एकूण शेतकरी खातेदार नोंदणी केलेले शेतकरी टक्के

परभणी १०३१७३ १०२१२ ९.८५
जिंतूर ९५०७७ ११५२० १२.१२
सेलू ८१४९८ ५४११ ६.६४
मानवत ४१६३५ २७४२ ६.५९
पाथरी ५५२१५ ३७५१ ६.७९
सोनपेठ .३३४०० ७८१९ २३.४१
गंगाखेड ७६४९६ ५०३८ ६.५९
पालम ४९९२२ ४८०० ९.६१
पूर्णा ६४५७१ ६१०२ ९.४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT