Jalgaon News: खानदेशात आगाप पेरणीचा मोठा काबुली हरभरा मळणीवर आला आहे. या हरभऱ्यास खानदेशात मॅक्सीकन किंवा डॉलर हरभरा म्हणूनही ओळखले जाते. पीकस्थिती यंदा चांगली होती. पिकात चोपडा (जि. जळगाव) भागात मळणी सुरू झाली आहे. अन्य भागातही पुढील आठवड्यात मळणी सुरू होईल, अशी स्थिती आहे. .रब्बीत खानदेशात किंवा तिन्ही जिल्ह्यांत सुमारे पावणेदोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खानदेशात हरभऱ्याची पेरणी झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख १५ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी रब्बीत झाली आहे. तसेच धुळे व नंदुरबारातही हरभऱ्याची पेरणी अधिक झाली होती. कोरडवाहू क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा तालुक्यात अनेकांनी दिवाळीच्या काळातच पेरणी केली होती. सतत पाऊसमान असल्याने हलक्या जमिनीत हरभऱ्याची पेरणी वेळेत होवू शकली नव्हती. परंतु काळ्या कसदार जमिनीत आगाप किंवा दिवाळीनंतर लागलीच पेरणी झाली होती..Kabuli Chane Threshing : काबुली हरभऱ्याची मळणी पूर्ण.काबुलीचा पेरा डिसेंबरमध्येखानदेशात काबुली हरभऱ्याची एकूण सुमारे २२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. जळगावातील चोपडा, रावेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा व शहादा भागात ही पेरणी होती. डिसेंबरमध्ये पेरणीचे पीक मळणीवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकास तीन वेळेस पाणी दिले आहे. तर काहींनी चार वेळेस पाणी दिले. या पिकात मागील महिन्यातच दाणे पक्व झाले. ते या महिन्यात मळणीवर आले. त्याची कापणी व मळणीचे काम सध्या खानदेशात सुरू आहे. चोपडा, जळगाव, यावल, शिरपूर भागात अनेक शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाची कापणी व मळणीचे काम सुरू झाले आहे..Kabuli Chana Threshing: मोठ्या हरभऱ्याची पंधरवड्यात काढणी, मळणी सुरू होणार.मजुरांची मनधरणीकापणी, मळणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यात कापणीसाठी एकरी चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च सध्या येत आहे. मजूरटंचाई आहे. उष्णताही मागील आठवड्यात वाढण्यास सुरवात झाली आहे. सध्या कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. सकाळी ११ नंतर ऊन तापू लागते. दुपारी चार ते सव्वाचारपर्यंत उष्णता असते..रात्री गारवा असतो. परंतु उष्णता वाढल्याने पीक मळणीस अनुकूल स्थिती तयार झाली आहे. अधिकची उष्णता नसल्याने शेतातील कामे दिवसभर शेतकरी उरकत आहेत. पुढे मळणीच्या कामास आणखी गती येईल. कारण हरभरा पक्व होण्याची क्रिया वेगात सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.