School Teacher Agrowon
ॲग्रो विशेष

Alibaug ZP School : एक हजारहून अधिक शिक्षकांची वानवा

Teacher Shortage : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या अपुऱ्या शिक्षकांमुळे अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांमध्‍ये शिक्षकांची एक हजारहून अधिक पदे रिक्‍त आहेत.

Team Agrowon

Raigad News : जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या अपुऱ्या शिक्षकांमुळे अंधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांमध्‍ये शिक्षकांची एक हजारहून अधिक पदे रिक्‍त आहेत. मुख्‍याध्‍यापकांचीही सुमारे ७५ टक्‍के पदे रिक्‍त असून आठ तालुक्‍यांतील शाळांमध्‍ये मुख्‍याध्‍यापकाचे एकही पद भरलेले नाही. यामुळे या शाळाही मुख्याध्यापकांविना अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्‍ह्यात जिल्‍हा परिषदेच्‍या अडीच हजारहून अधिक प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्‍ये मुख्‍याध्‍यापक, उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे मिळून सहा हजार २३१ पदे मंजूर आहेत; परंतु प्रत्‍यक्षात पाच हजार ५१३ पदे असल्‍याचे पाहायला मिळते. मुख्‍याध्‍यापकांची १११ पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे भरलेली आहेत. महाड, माणगाव, म्‍हसळा, मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन, तळा या आठ तालुक्यांत एकही मुख्‍याध्‍यापक कार्यरत नाही.

जिल्‍ह्यात इंग्रजी माध्‍यमाच्या शाळांची संख्‍या दरवर्षी वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील पालकांचाही कल इंग्रजी माध्‍यम शाळांकडे वाढल्‍याने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील पटसंख्‍या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढताना शिक्षण विभागाची ओढाताण होत आहे.

ही कमतरता भरून काढण्‍यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्‍ती देण्‍याचा निर्णय घेतला होता; परंतु त्‍याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. पटसंख्‍या कमी झाल्‍याने अनेक शाळांमध्ये सध्या एकच शिक्षक तीन ते चार वर्ग सांभाळत आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थी गुणवत्तेच्‍या अनुषंगाने केंद्रप्रमुख, शिक्षण विस्‍तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्‍हा परिषद शाळांना भेटी देणे आवश्‍यक असते; परंतु ही पदेदेखील मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत.

राज्य सरकारने जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांसाठी नवीन शिक्षण संच धोरण आणले आहे. या धोरणानुसार प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवी ‍या वर्गांसाठी शिक्षकांची संख्‍या कमी होणार आहे. सध्या पटसंख्येनुसार शिक्षकांच्या जागा भरलेल्या आहेत. आवश्यकता असल्यास एखाद्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक भरती ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने केली जाते.
- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT