ZP School Education : विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार

Education Department : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. आता वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अजूनपर्यंतही जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळाली नाहीत.
Rural Education
ZP School EducationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : फेब्रुवारी महिना संपत आला आहे. आता वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अजूनपर्यंतही जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळाली नाहीत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडसर ठरणाऱ्या संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद शासकीय शाळा टिकून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असताना शासनाच्या याच विभागातील अधिकाऱ्यांचे खासगी शाळांनी असलेल्या आर्थिक साटेलोट्यातून गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

Rural Education
ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही क्रमिक पुस्तके मिळाली नसल्याने त्यांना परीक्षेसाठीचा अभ्यास कसा करावा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी मराठी मुलांच्या शाळा टिकाव्यात म्हणून प्रयत्नशील असतात.

याउलट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे आपण या बाबत लेखी तक्रार देणार असल्याचे जालिंदर वाकचौरे म्हणाले.

Rural Education
ZP School : ‘झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांत लवकरच सीसीटीव्ही

अधिकाऱ्यांची नावे मुख्यमंत्र्यांना देणार

महाराष्ट्र भाजप प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे म्हणाले, की अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना कायद्याचा कठोर बडगा दाखवून शिक्षकांना वेठीस धरणारे शिक्षण खात्यातील अधिकारी खासगी शाळांची कुठलीही तपासणी हे अधिकारी करीत नाहीत.

खासगी शाळेत शिकाणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांचा आहार, त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक, बोगस आणि विनाप्रशिक्षित शिक्षक याबाबतची तपासणी हे अधिकारी कधीही करीत नाहीत. अहिल्यानगर जिल्ह्यातील या अधिकाऱ्यांची नावेही मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे देणार आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com