Electricity Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Abhay Yojana : अहिल्यानगरच्या १ हजारवर वीज ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती

Electricity Bills : महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यात लाभ १ हजार ९१७ ग्राहकांनी लाभ घेतला असून १ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा करून कायमची वीज थकबाकीतून मुक्ती मिळवली आहे.

या योजनेचा लाभ शनिवारपर्यंत (ता. ३०) थकबाकी भरून घेता येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकित वीजबिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे.

अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार असून अहिल्यानगर मंडळातील एकूण १ हजार ९१७ लघुदाब ग्राहकांनी १ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली असून नवीन वीज जोडणी मिळण्यासाठी पात्र झाले असून, उर्वरित वीज ग्राहकांचे काम प्रगतिपथावर आहे.

३१ मार्चपर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक आदी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल अइॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल.

अहिल्यानगर मंडळातील

विभागनिहाय

ग्राहकांनी भरलेली रक्कम (लाखात)

अहिल्यानगर शहर विभाग

 ग्राहक ः ४७३

 भरलेली रक्कम ः २६.०८

ग्रामीण विभाग

 ग्राहक ः ३२९

 भरलेली रक्कम (लाखांत) ः ३९.१९

कर्जत विभाग

 ग्राहक ः ३७८

 भरलेली रक्कम ः ३०.९१

संगमनेर विभाग

 ग्राहक ः ३२१

 भरलेली रक्कम ः ४५.९८

श्रीरामपूर विभाग

 ग्राहक ः ४१६

 भरलेली रक्कम ः २६.६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT