vilas shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Vilas shinde : सह्याद्री ॲग्रो फार्म’च्या विलास शिंदे यांना ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार

Sahyadri Agro Farm : नाशिकमधील 'सह्याद्री फार्म्स' या कंपनीचे संचालक विलास शिंदे यांचा 'उत्कृष्ट मराठी उद्योजक' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘देशातील सर्वांत युवा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. त्यामुळे आपल्याला अनेक संधी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राने पुढील ३० वर्षांच्या औद्योगिक विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली पाहिजे. तसेच कौशल्य विकासाला महत्त्व दिले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी (ता. २०) केले.

उद्योग विभागाच्या वतीने उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न, सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना उद्योगमित्र, गौरी किर्लोस्कर यांना उद्योगिनी आणि ‘सह्याद्री ॲग्रो फार्म’च्या विलास शिंदे यांना ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, शनिवारी (ता.१९) मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांनी उद्योगपती रतन टाटा यांना निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला.

रविवारी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे अन्य पुरस्कारांचे वितरण झाले. राज्यपाल बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT