Cotton Wilt Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : कपाशीच्या पिकांमध्ये आकस्मिक मर

Para Wilt Disease : मूळकुज झाल्यामुळे फुले, बोंडे लागलेल्या अवस्थेतीतील कपाशीची झाडे सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीमध्ये आकस्मिक मर आढळून येत आहे. मूळकुज झाल्यामुळे फुले, बोंडे लागलेल्या अवस्थेतीतील कपाशीची झाडे सुकून जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात यंदा १ लाख ९७ हजार हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. शनिवार (ता. ३१) ते सोमवार (ता. २) या कालावधीत या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.

जमिनीतून अतिरिक्त पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या कपाशीच्या पिकांमध्ये मूळकूज होऊन कपाशीच्या झाडांना मर लागल्याचे आढळून येत आहे. या परिस्थितीत अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कपाशीची एक ओळ सोडून लहान चर काढावेत. शक्य असेल तिथे वाफसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.

उपाययोजना ः

आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००ः००ः ५० खत ) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिलि याप्रमाणे आळवणी करावी.

आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. या उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच २४ ते ४८ तासांच्या आत कराव्यात, म्हणजे होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

पिकाची वाढ पुर्ववत होऊन पाते लागण होण्यासाठी पीक ६० दिवसांचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. कोरडवाहू कपाशीसाठी प्रति एकरी ३१ किलो आणि बागायती कपाशीसाठी ५१ किलो निमकोटेड युरिया वापरावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील कृषिविद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, डॉ. डी. डी. पटाईत, एम. मांडगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ०२४५२-२२९००० व्हाटसअप हेल्पलाइन- ८३२९४३२०९७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT