Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Study Tour : शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन

Horticulture Program : एकात्मिक फलोत्पादनविकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत, शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून यासाठी पात्र शेतकऱ्यांनी गुरुवारपर्यंत (ता.१५) अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादनविकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत, शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट राज्याबाहेर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्यात फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे,

आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करून देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचे राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. शिवाय इतर महत्वाच्या बाबींचाही समावेश आहे.

फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादी बाबत प्रशिक्षणासाठी घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज, सात बारा, ८ अ, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT