Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ऊसशेतीत सेंद्रिय शेतीपद्धती फायद्याची

Organic Farming Method : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. तिच्यात एक ताकद, शक्ती होती, पण आता ती क्षीण होत चालली आहे.

Team Agrowon

Solapur News : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. तिच्यात एक ताकद, शक्ती होती, पण आता ती क्षीण होत चालली आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य जपण्याची गरज आहे आणि ही शक्ती केवळ सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतून मिळणार आहे, ऊसशेतीसाठी तर सेंद्रिय पद्धती अतिशय उपयुक्त ठरते आहे, असे मोडनिंबच्या उमा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रशांत कुंभार यांनी ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथे व्यक्त केले.

ओम गुळ कारखाना ओझेवाडी येथे कारखाना कार्यस्थळावर ‘ॲग्रोवन’ च्या १९ व्या वर्धापनादिनानिमित्त जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १९) ऊस व्यवस्थापनावर शेतकऱयांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

त्यावेळी प्रा. कुंभार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दत्तात्रय सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन समाधान घाडगे, राजलक्ष्मी ऑरगॅनिक्सचे कार्यकारी संचालक अजयसिंह इंगवले पाटील, संचालक विजयसिंह इंगवले- पाटील, प्रगतशील शेतकरी अच्युतराव सावंत, गोरख ननवरे, संजय ताड, यशवंत सावंत उपस्थित होते.

श्री. कुंभार म्हणाले, की ऊस व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे, कमी खर्चात, अधिकचे उत्पादन कसे मिळेल, हे त्याचे सूत्र असले पाहिजे. ऊसात लागवडीचे अंतर पाच बाय दोन किंवा सहा बाय दीड फूट ठेवायला हवे. निरोगी जोमदार योग्य काळजी घेतलेली बेणे मळ्यातील नऊ ते अकरा महिन्याचे बेणे किंवा त्या बेण्यापासून तयार केलेले जोमदार निरोगी रोप लागवडीसाठी वापरावे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी अन्नद्रव्याचे व्यवस्थापनावरही काही महत्वाचे मुद्दे शेतकऱ्यांना सांगितले. माजी आमदार सावंत यांनी शेतकऱ्यांना, सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲग्रोवनचे संदेश कुलकर्णी यांनी केले. विश्वास नागणे यांनी सूत्रसंचालक केले. राजलक्ष्मी ऑरगॅनिक्सचे कार्यकारी संचालक अजयसिंह इंगवले-पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT